शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

दोन महिन्यानंतर ‘त्या’ मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा; दोघे कर्नाटकातून ताब्यात, मुख्य आरोपी फरार

By दिपक ढोले  | Published: October 28, 2022 10:23 AM

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात जालना पोलिसांना यश आले आहे.

जालना: घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात जालना पोलिसांना यश आले असून, दोन आरोपींना कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य आरोपी फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.   २२ ऑगस्टला समर्थ रामदास स्वामींच्या देव्हाऱ्यातील प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह अन्य पंचधातूच्या मूर्तींची चोरी झाली होती. त्या घटनेला  दोन महिने उलटल्यावर पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नव्हते.  यासाठी पोलीस यंत्रणेकडून सर्व बाजूंनी तपासाची सूत्र फिरविण्यात आली. असे असताना कुठलाच सुगावा पोलिसांना लागला नव्हता.  यामुळे संपूर्ण रामभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आणि रोषही होता. यासाठी सर्व साधु- संतांनी जांब समर्थ येथे एकत्रित येत मोठे आंदोलन केले होते; परंतु, त्यानंतरही मूर्तीचा तपास लागला नव्हता. यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. दिवाळीच्या काळात पोलिसांनी चौकशी करून कर्नाटकातून दोन  आरोपींना ताब्यात घेतले आहे.  मुख्य आरोपी फरार असून, मूर्ती अद्यापही मिळाल्या नाहीत, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalanaजालना