शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:55 IST

भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. देऊळगावराजा-चिखली मार्गावरील दगडवाडी फाट्यावर गुुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. देऊळगावराजा-चिखली मार्गावरील दगडवाडी फाट्यावर गुुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.आकाश ज्ञानेश्वर देशमुख (रा. दहेगाव, ता.जाफराबाद) शुभम राऊत (रा.औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत. धनंजय रवींद्र वायाळ (रा.जालना) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेही जालना येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.देऊळगावराजा पोलीस ठाण्याचे पोनि. एस. डी. नवलगावकर यांनी सांगितले, की अपघाग्रस्त तिघेहीे लग्नाच्या कार्यक्रमाहून दुचाकीवरून जालन्याकडे परत येत होते. देऊळगावराजा-चिखली दरम्यान दगडवाडी फाट्याजवळ चिखलीकडे जाणारी भरधाव कार व दुचाकीची धडक झाली. अपघातात दुचाकीवरील आकाश देशमुख व शुभम राऊत यांचा जागेवरच मृत्यू झाला. माहिती मिळताच देऊळगावराजा ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी धनंजय वायाळ यास जालना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरा मृतांचे नातेवाईक देऊळगावराजा येथे पोहोचले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू