शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राट घेण्यावरून दोन गट भिडले; हाणामारी सोडविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:05 IST

जालना शहरातील नागेवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका कंपनीच्या लेबरचे कंत्राट घेण्यावरून दोन गटांत हाणामारी सुरू होती.

जालना : एका कंपनीचे कंत्राट घेण्यावरून सुरू असलेली हाणामारी सोडविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने हवेत गोळीबार केल्याची घटना जालना शहरातील नागेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या हाणामारीत तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

जालना शहरातील नागेवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका कंपनीच्या लेबरचे कंत्राट घेण्यावरून दोन गटांत हाणामारी सुरू होती. तेवढ्यात सपोनि. साईनाथ रामोड हे बदनापूरकडे जात होते. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव शांत होत नसल्याने त्यांनी हवेत एक राउंड फायर केला. त्यामुळे जमाव पांगला. हाणामारीत ज्ञानेश्वर तुकाराम वाघुडे, गणेश तुकाराम वाघुडे व कृष्णा रूस्तुम वाळके (सर्व रा. नागेवाडी, जालना) हे जखमी झाले होते. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी दिली.

सात संशयित ताब्यात : एसपींची घटनास्थळाला भेटघटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी नीरज राजगुरू, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि. रघुनाथ नाचण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना