शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वाहनांना वीस लाख रुपयांंचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:32 IST

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ९ वाहनांविरुध्द तहसीलदार संतोष गोरड यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई ताब्यात घेतले होते. या वाहनांवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ९ वाहनांविरुध्द तहसीलदार संतोष गोरड यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई ताब्यात घेतले होते. या वाहनांवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, आजवर २ लाख ८४ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.वाळू तस्करांवर तहसीलदार संतोष गोरड यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई करून ९ वाहने जप्त करण्यात आली होती. कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी तहसिलदार संतोष गोरड यांनी हायवातील (एम.एच.२०-ई.एल.- ९६००) ४ ब्रासला २ लाख ८४ हजार ९०० रूपये, (एम.एच.०४-ई.वाय.- ६४२४) ५ ब्रासला ३ लाख ६ हजार १२५, एका हायवातील ६ ब्रासवर ३ लाख २७ हजार ३५०, टिप्पर (एम.एच. २० ई.जी.- ६६२८) २ ब्रासवर १ लाख ४२ हजार ४५०, हायवा (एम.एच.२१ -बी.एच.२२९१) ५ ब्रासवर ३ लाख ६ हजार १२५, ट्रॅक्टर (एम.एच. २१ - बी.एच. १६३४) १ ब्रासवर १ लाख २१ हजार २२५, तर विना क्रमांकाच्या एका ट्रॅक्टरमधील १ ब्रास प्रमाणे व इतर दोन हायवा जप्त केल्या. त्यांना ५ लाख ६९ हजार रूपये दंड ठोठावला आहे. मात्र त्याचे क्रमांक मिळाले नाहीत. तहसिलदारानी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाºया वाहनांवर तब्बल २० लाख ५७ हजार ९७५ रूपये दंड आकारला आहे. पैकी केवळ एका हायवा चालकाने २ लाख ८४ हजार ९०० रूपये दंड भरला आहे़ दरम्यान, महसूलच्या पथकाने हसनाबाद, लतिफपूर परिसरातील सहा जणांच्या शेतात ७६ ब्रास वाळूचा साठा जप्त केला होता. संबंधितांच्या सातबा-यावर तब्बल २० लाख १७ हजार १८५ रूपयांचा बोजा चढविण्यात आला आहे.तर वाळुची वाहने धुवून देण्याचे काम करणाºया चार पॉइंट धारकावर १०७ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधाकर दाभाडे, सुधकार वनार्से, हरिदास मोरे, पंढरीनाथ खडेकर यांचा समावेश महसूलकडून सांगण्यात आले.भोकरदन तालुक्यात वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. होणा-या कारवाई कागदोपत्री केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. वाळूची तस्करी थांबली तर नदीपात्रात पाणी थांबणार असून, सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे.काही शेतकरीही वाळू तस्करांना मदत करीत असल्याने वाळू तस्करांना लगाम लागणार तरी कधी ? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभाग