शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या तक्रारींसाठी भरोसा सेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:07 IST

शहरी, ग्रामीण भागातील महिलांसह मुलींच्या तक्रारींचे निरसण करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरी, ग्रामीण भागातील महिलांसह मुलींच्या तक्रारींचे निरसण करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयात सुरू होणाऱ्या या सेलचे जागतिक महिला दिनी रविवारी कामकाज सुरू होणार आहे.महिलांच्या कौटुंबिक तक्रारी सोडविण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दलांतर्गत विशेष महिला सुरक्षा कक्ष सुरू आहे. या कक्षात महिलेच्या सासर- माहेरच्या मंडळींचे समुपदेशन करून मोडकळीस आलेला संसारात पुन्हा हस्य फुलविण्याचे काम केले जात आहे. पोलीस विभागाने यापुढे एक पाऊल टाकत आता महिलांच्या कौटुंबिकच नव्हे तर इतर तक्रारींचे निरसण करण्यासाठी भरोसा सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांची होणारी भांडणे व इतर तक्रारींची या सेलमध्ये समुपदेशनाने सोडवणूक केली जाणार आहे. शिवाय शालेय मुलींच्या तक्रारीही या कक्षात घेतल्या जाणार आहेत. जालना येथे सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलचे कामकाज पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपाधीक्षक (गृह) अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा कक्षाच्या पोउपनि एस. बी. राठोड व त्यांची टीम या पाहणार आहे. या सेलचे रविवारी जागतिक महिला दिनी उद्घाटन होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, कारागृह अधीक्षक अरूणा मुगूटराव, स्त्रीरोग तज्ज्ञ अश्विनी मिसाळ, प्रा. डॉ. सीमा निकाळजे, अ‍ॅड. आर. एस. ओहळ, अनया अग्रवाल यांची उपस्थिती राहणार आहे.अशी राहणार सुविधाया भरोसा सेलमध्ये पोलीस अधिकारी- कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, कायदे तज्ज्ञ, समुपदेशक आदी कार्यरत राहणार आहेत.भारोसा सेलमध्ये एखादी महिला, मुलगी तक्रार घेऊन आली आणि तिला निवाºयाची गरज असेल तर संबंधित तक्रारदारास तात्पुरत्या स्वरूपात निवाराही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसWomenमहिलाSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी