शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-पिकअपच्या भीषण अपघातात सासू-जावयासह अन्य एक ठार; मृत जळगाव जिल्ह्यातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 11:52 IST

गाडीतील सर्वजण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर दरवाजा मारोती मंदिर एरंडोल येथील रहिवाशी आहेत.

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना ) : ट्रक आणि पिकअपच्या भीषण अपघातात तिघे मृत्युमुखी पडल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भोकरदन- जालना रोडवरील बानेगाव पाटीजवळ घडली. मृतांमध्ये सासू-जावयाचा समावेश आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रामदास रामरतंन पाटील, कल्पनाबाई भरत पाटील, कल्पना गोविंदा ठाकूर, सचिन सुखलाल पाटील आणि भारत पाटील हे पाचजण कुरडई-पापड विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठीच मंगळवारी सर्वजण पिकअपमध्ये (क्रमांक एम एच -19 सि वाय 1091) जालना येथे निघाले होते. जालना येथे जाण्यासाठी रात्री उशीर झाल्याने भोकरदन तालुक्यातील रिकाम्या जागेत त्यांनी पिकअप गाडी उभी केली. रात्रभर तिथेच मुक्काम केल्यानंतर सर्वजण सकाळी लवकर जालन्याच्या दिशेने निघाले. दरम्यान, सकाळी बाणेगाव पाटीजवळ जालन्याहून येणाऱ्या ट्रकसोबत (क्रमांक एम एच - 40 एके 5156 ) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. 

यात कल्पनाबाई भरत पाटील ( 47), रामदास रामरतंन पाटील ( 40 ) यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे सासू-जावई असल्याची माहिती आहे. तर जालना येथे उपचारासाठी दाखल केलेल्या तीन जखमींपैकी कल्पना गोविंदा ठाकूर ( 45 ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सचिन सुखलाल पाटील ( 40) आणि भारत पाटील ( 55) यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. गाडीतील सर्वजण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर दरवाजा मारोती मंदिर एरंडोल येथील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस कर्मचारी दादाराव बोर्डे, विकास जाधव, दत्ता राऊत, अनिल गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना