शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:24 IST

जिल्ह्याच्या विविध भागात सलग तिस-या दिवशी गुरूवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / भोकरदन : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात सलग तिस-या दिवशी गुरूवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात १९.६ मिमी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात ५५.१३ मिमी, तर अंबड तालुक्यात ४०.५७ मिमी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील बहुतांश नद्या तुडुंब वाहत असून, प्रकल्पांची पाणीपातळी वाढत आहे. तर पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.भोकरदन तालुक्यातील धावडा, पारध, पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, जळगाव सपकाळ, आन्वा, वाकडी, हिसोडा, दानापूर या भागात प्रारंभीपासून चांगला पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात झालेल्या पावसामुळे या भागातील जुई, धामणा, पद्मावती या मोठ्या प्रकल्पांसह पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे ओसंडून वाहत आहेत.तालुक्यातील रायघोळ, नदीला आलेल्या पुरामुळे पारध येथील गणेश वस्तीमध्ये पाणी शिरले होते. धामणा धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे शेलूद येथील दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पातून केळना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे केळना नदीला आलेल्या पुरामुळे भोकरदन- आलापूर हा रस्ता तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गोकुळ, प्रल्हादपूर, वाडी या गावांना आन्वा रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्याचप्रमाणे दावतपूर ते टाकळी मध्ये असलेल्या पुलावर केळना नदीच्या पुराचे पाणी असल्यामुळे तीन दिवसांपासून या गावाचाही संपर्क तुटला आहे. शिवाय जुई, रायघोळ, धामणा, केळना या नद्यांना पूर आला होता.भोकरदन तालुक्यातील अर्ध्या भागात झालेल्या पावसामुळे दोन-तीन वर्षाच्या पावसाची सरासरी सुध्दा यावर्षी पावसाने ओलांडली आहे. तालुक्यात १८ सप्टेंबर पर्यंत ६०६़५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १८ सप्टेंबर रोजी सर्वाधिक पाऊस धावडा मंडळात झाला असून, एकाच दिवशी या मंडळात १४७ मिमी पाऊस झाला. तर भोकरदन ३७, हसनाबाद ४०, सिपोरा बजार ४२, आन्वा ७०, पिंपळगाव रेणुकाई ६०, केदारखेडा २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.हायवा नदीपात्रातचभोकरदन : लिंगेवाडी येथील केळना नदीच्या पुलावरून वाहून गेलेला हायवा (क्र. एम.एच.२१- बी.एच. ७७००) गुरूवारी नदीपात्रात दिसून आला. मात्र, पाण्यातून हा हायवा बाहेर काढायचा कसा, असा प्रश्न संबंधितांना पडला आहे.

टॅग्स :RainपाऊसriverनदीDamधरणfloodपूर