शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:19 IST

अंबड तालुक्यातील रोहिलागड शिवारातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड शिवारातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला. चोरट्यांनी वृध्द दाम्पत्यास जबर मारहाण रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपासकेले.रोहिलागड गावच्या शिवारातील शेतवस्तीवर दादाराव नाथा मगरे (६४) व त्यांची पत्नी निलाबाई दादाराव मगरे (६०) हे राहतात. बुधवारी मध्यरात्री तीन चोरांनी मगरे यांच्या घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला.तीन चोरांनी लोखंडी रॉड, दांड्यांनी मगरे दाम्पत्यास मारहाण केली. घरातील रोख १६ हजार रूपये व सोन्याच्या दोन पोत घेऊन चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत मगरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, दादाराव मगरे यांचा हात मोडला आहे. तर निलाबाई यांच्या पायाला जबर मार लागला आहे. दोन्ही जखमींवर औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस पोलीस अधीक्षक सी. डी. शेवगन, पोउपनि सुग्रीव चाटे, जमादार व्ही. पी. लोखंडे, कुटे, गायके, लहाने, जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेची गुरूवारी सायंकाळपर्यंत अंबड पोलिसात नोंद सुरू होती. एकूण किती रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला ? याची माहिती पोलिसांनी उशिरापर्यंत दिली नाही. अधिक तपास पोनि अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश शेजूळ हे करत आहेत.

टॅग्स :DacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीjewelleryदागिने