शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

"ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?"; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 09:47 IST

विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन मंगळवारी होत असून, या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होऊन चर्चेअंती हे विधेयक मंजूर केले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, आजच्या अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा न झाल्यास उद्यापासून आंदोलन काय असतं ते सरकारला कळेल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. विधेयकात मराठा समाजाला नोकरीत १२ आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली. तर, सगेसोयरे अध्यादेशाबाबत कुठलाही निर्णय होणार नसल्याचेही समजते. त्यातच, जरांगे यांनी आज पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. जे खड्ड्यात जाणारं आरक्षण आहे ते दिलं जातंय. आज घोषणा करुन पहिल्यांदा ते सगेसोयऱ्याचं प्रकरण घ्या. अन्यथा आंदोलनाची आमची पुढची दिशा ठरली आहे. आज यांनी निर्णय न घेतल्यास उद्या आंदोलन सुरूच झालं, असा इशाराही जरांगे यांनी दिला. यावेळी, एसईबीसी आरक्षणातून नोकरी मिळालेल्या पण अद्यापही नियुक्ती न झालेल्या एका युवकांची व्यथाही त्यांनी सांगितली. 

लाखो पोरं बेरोजगार आहेत, कमरेला बेल्ट बांधून फिरायचं, पण आंदोलन करायची वेळ त्यांच्यावर आलीय, आता वयही निघून चाललंय. वाटोळं झालं पोरांचं. आताही हे आरक्षण नाही टिकल्यावर तेच होणार त्यांचं. त्यामुळे, आमची मागणी ही ओबीसीतून आरक्षणाची आहे. तुम्हाला तीन लोकं महत्त्वाचे की ५ कोटी मराठे महत्त्वाचे?, असा सवालही जरांगे यांनी विचारला. 

एसईबीसीतून एका पोराची अधिकारी म्हणून निवड झाली, त्याला गावात वाजत-गाजत नेलं. त्या घटनेला आता साडेचार वर्षे झाली आहेत. ते पोरगं आणखी गावात गेलंच नाही. कारण, गावाकडं सांगितलंय की साहेब झालाय म्हणून. पण, त्याला अजूनही नियुक्तीच मिळाली नाही. जमलेललं लग्नही अजूनही झालं नाही. वाटोळं झालं त्या मागच्या आरक्षणामुळं या पोरांचं, असे म्हणत एसईबीसी आरक्षणातील पीडित युवकाचं उदाहरणही जरांगेंनी दिलं.  

खड्ड्यात जाणरं आरक्षण दिलं जातंय

ओबीसीमध्ये नोंदी सापडल्या आहेत, मग हसत खेळत दिलं पाहिजे.  तुम्ही त्याचं एकट्याचं ऐकता आणि तो विरोधात गेल्यावर आमचं काय होईल असं म्हणता. पण, मराठे तुमच्या विरोधात गेल्यावर मग कसंय?, असे जरांगे यांनी म्हटले. उलट आपल्या नशिबात मराठ्यांच्या नोंदी कुणबीत सापडल्या आहेत. त्यामुळे, सहज दिलं पाहिजे होतं, सरकारला ही संधी आहे समजून आरक्षण दिलं पाहिजे. पण, जे टिकणारं आहे ते देत नाहीत. पण, जे खड्ड्यात जाणारं आहे ते आरक्षण हे द्यायलेत, असे म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. 

ओबीसीतूनच आरक्षण द्या

सरकारला काही घेण देणं नाही. सत्ताधाऱ्यांच्या अंगात रग आणि मगरुरी असेल तर मराठा मराठा आहे. आता, आमची हातं टेकली आहेत. मराठा आम्ही, कुणबी आम्ही आणि ओबीसीपण आम्हीच. म्हणून, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, असेही जरांगे यांनी म्हटले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण