शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात चार वर्षांत वाढल्या १०९ इंग्रजी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:57 IST

गत चार वर्षांत जिल्ह्यात तब्बल १०९ इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्पर्धेच्या युगात इंग्रजीला आलेले महत्त्व आणि पालकांचा इंग्रजीशाळांकडे वाढलेला कल यामुळे गत चार वर्षांत जिल्ह्यात तब्बल १०९ इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. वारेमाप फीस आकारणाऱ्या काही इंग्रजी शाळांमधील गुणवत्तेचा प्रश्न मात्र, कायम आहे. विशेषत: अपवाद वगळता झालेल्या तक्रारींमुळे अनेक शाळा चौकशीच्या फे-यात अडकल्या आहेत.वाढत्या स्पर्धेमुळे सुरू झालेल्या इंग्रजी शाळांमुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आणि वारेमाप फीस आकारली जाऊ लागली. अनेकांनी व्यवसाय म्हणून इंग्रजी शाळा सुरू केल्याचे चित्र आहे. जालना जिल्ह्यात २६७ इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. मागील चार वर्षात तब्बल १०९ शाळांची भर पडली आहे. २०१५-१६ साली जिल्ह्यात १५८ इग्रंजी शाळा होत्या. २०१६-१७ मध्ये ही संख्या १७४ वर पोहचली. २०१७-१८ मध्ये १९७ शाळा सुरु झाल्या तर २०१८-१९ मध्ये हाच आकडा २६७ वर जाऊन पोहोचला. यंदाही शाळांचे अनेक प्रस्ताव प्रशासनाकडे आलेले आहेत.इंग्रजी शाळा सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी भरले जाणारे शिक्षक, त्यांचे शिक्षण याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेकांकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्याच्याही तक्रारी असून, याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या शाळांमुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले असले तरी संस्था चालकांनी किमान गुणवत्तेकडे लक्ष देऊन भावी पिढी घडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.इंग्रजी शाळा नियमांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे धडकल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा तपासण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.जाफराबाद, भोकरदन, परतूर, मंठा, अंबड या तालुक्यातील शाळेंचा अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. तर जालना, बदनापूर या तालुक्यातील शाळांचा अहवाल शिक्षण विभागाकडे येणे बाकी असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Schoolशाळाenglishइंग्रजीEducationशिक्षण