शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जालन्यात आरक्षणासाठी तरुणाने घेतले पेटवून, आई भाजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 05:57 IST

मंगल गणेश जाधव  आणि सूरज गणेश जाधव असे भाजलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे

लोकमत न्यूज नेटवर्क  जालना/छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सरकार काही निर्णय घेत नसल्याचे म्हणत अंगावर पेट्रोल टाकून १८ वर्षीय तरुणाने पेटवून घेतल्याची घटना बुधवारी सकाळी पाथरवाला बुद्रूक (ता. अंबड, जि. जालना) येथे घडली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईदेखील गंभीररीत्या भाजली. दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगल गणेश जाधव  आणि सूरज गणेश जाधव असे भाजलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. मंगल जाधव या ३५ टक्के भाजल्या असून,  सूरज ६० टक्के भाजला आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी दिली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील गणेश जाधव यांचे कपडे जळाले. सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचाराची सोय करावी, अशी मागणी सूरजचे मामा मुरलीधर खरात यांनी केली आहे.

३ महिन्यांपासून आंदोलनात सहभाग सूरज हा गेल्या ३ महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी आहे. गावात चार दिवस उपोषणही केले. त्याला दहावीला ७४ टक्के गुण मिळाले. शासकीय आयटीआयला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे खासगी आयटीआयला प्रवेश घेतला. मात्र, त्यासाठी शुल्क भरणे अवघड होते. सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेत नसल्याने तो नाराज होता. 

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण