शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण सुटून ट्रॅक्टर खड्ड्यात उलटले; वेळीच बाहेर पडता न आल्याने चालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:49 IST

अंबड तालुक्यातील कर्जत शिवारातील घटना..

अंबड (जालना): अंबड तालुक्यातील कर्जत-लोणार-भायगाव रस्त्यावर शेंडगे तांडा येथे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उलटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( दि.२ ) दुपारी २. ३० वाजेच्या सुमारास घडली. आदित्य भगवान उन्हाळे ( २०, रा. आवा अंतरवाला ता.अंबड ) असे मृत चालकाचे नाव आहे. 

आवा अंतरवाला येथील आदित्य हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असेल. सोमवारी दुपारी आदित्य ट्रॅक्टर ट्रॉलीमधील माल रिकामा करून परत चालला होता. कर्जत गाव शिवारातील शेंडगे तांडा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटून ट्रॅक्टर रस्त्याखालील खड्ड्यात जाऊन उलटले. यावेळी चालक आदित्य हा ट्रॅक्टर खाली दबला गेला. वेळीच बाहेर पडता न आल्याने आदित्यचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, माहिती मिळताच अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक छोटुराम ठुबे, पोलिस कर्मचारी रविंद्र चव्हाण यांनी अपघातस्थळी धाव घेतली. रस्त्यालगत असलेला खड्डा खोल असल्याने मृतदेह काढण्यास अडचण आली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मृत आदित्यच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.  घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना