शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीशक्तीची ताकद, २११ गावखेड्यांना उन्नतीच्या मार्गावर नेतायत २०८५ बचत गटातील महिला !

By विजय मुंडे  | Updated: July 25, 2023 16:02 IST

कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली; समूह उद्योग, वैयक्तिक उद्योगातून वाढली आर्थिक उलाढाल

जालना : जिल्ह्यातील १०-२० नव्हे तब्बल २११ गावखेड्यातील २०८५ बचत गटाअंतर्गत महिलांनी वैयक्तिक, समूहस्तरावरील उद्योग सुरू केले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत (माविम) विविध शासकीय योजनांचा लाभ, बँकांचे कर्ज घेऊन या महिलांनी उद्योग, व्यवसाय सुरू केले असून, स्थानिक बाजारपेठेत या मालाला मागणीही वाढली आहे. महिलांच्या पुढाकारातून त्यांच्या कुटुंबाची प्रगती होत असून, गावांतील व्यवहारालाही चालना मिळाली आहे.

महिला, मुलींच्या उन्नतीसाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे, उद्योग सुरू करणे, उद्योगासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम माविम अंतर्गत केले जाते. माविमअंतर्गत जिल्ह्यातील २२१ गावांत २०८५ महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटांमध्ये प्रत्येकी १० ते १२ महिलांचा समावेश असून, एकूण २४ हजार २८ महिला या बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत. या गटांतर्गत मासिक बचत करणेच नव्हे तर स्वत:चे उद्योग, सामूहिक उद्योग सुरू करण्याचे कामही माविमअंतर्गत करण्यात आले आहे. या गटांमुळे संबंधित महिलांची त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर गावाची प्रगती होण्यासही हातभार लागल्याचे दिसून येत आहे.

सामूहिक स्तरावरील उद्योगमाविमअंतर्गत बँकामार्फत सामूहिक उद्योग सुरू करण्यासाठी एक लाख ते १७ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. महिलांनी समूह शेती, भाडेतत्त्वावर शेती, धान्य खरेदी- विक्री, निंबोळी अर्क, भाजीपाला खरेदी विक्री, कापडी पिशव्या शिवणे, फिनाईल हँडवाॅश, एलईडी बल्ब, दाळमिल, मिरची पावडर, हळद पावडर, विविध मसाले, पापड तयार करणे, हॅण्डीक्रॉप वस्तू, दूध संकलन आणि प्रक्रिया आदी उद्योग सुरू केले आहेत.

वैयक्तिक उद्योगमहिलांना वैयक्तिक उद्योग सुरू करण्यासाठी बँकांकडून एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यात शिवणकाम, ब्यूटीपार्लर, भोजनालय, स्टेशनरी, कटलरी, किराणा दुकान आदी विविध उद्योग महिलांनी सुरू केले आहेत.

स्थानिक ते जिल्ह्याची बाजारपेठ काबीजसामूहिक, वैयक्तिक उद्योगातून उत्पादित होणारा माल हा स्थानिक बाजारपेठ ते जिल्हास्तरावरील बाजारपेठेत विक्री केला जात आहे. विशेषत: विभागीय, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनातही बचत गटाचे उत्पादन मांडून त्याला बाजारपेठ मिळवून दिली जात आहे.

आर्थिक उन्नती झाली महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचतगटातील महिलांना उद्योग, व्यवसायासाठी प्रेरित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२१ गावांत महिला बचतगट सुरू झाले असून, अनेक महिलांचे व्यवसाय सुरू झाले असून, महिलांची आर्थिक उन्नती झाली आहे. -उमेश काहाते, जिल्हा समन्वय अधिकारी

विकासात महिलांचा वाटा आमच्या विभागातील अनेक महिलांनी सामूहिक, वैयक्तिक व्यवसाय सुरू केले आहेत. उत्पादित मालाला शहरी, ग्रामीण भागात माेठी मागणी आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक उन्नती होत असून, गाव-शहरांच्या विकासात महिलाही वाटा उचलत आहेत.-मीनाक्षी घायाळ, सीएमआरसी व्यवस्थापक

टॅग्स :JalanaजालनाWomenमहिलाEconomyअर्थव्यवस्था