शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फळगळीने मोसंबीचा पडला भाव, शेतकऱ्यांची भरपाईसाठी शासनाकडे धाव

By रवी माताडे | Updated: August 17, 2023 18:55 IST

पंचनामे करून विमा रकमेसह आर्थिक मदतीकडे मोसंबी उत्पादकांचे लक्ष

जालना : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली मोसंबीची फळगळ उपाययोजना करूनही थांबता थांबेना., त्यातच ३५ ते ४० हजार रुपये टन भाव देणारी मोसंबी आता १२ ते १६ हजार रुपये देत आहे, त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी तसेच मोसंबीचा विमा तत्काळ देण्याची कार्यवाही करावी., यासाठी उत्पादकांचे लक्ष आता शासनाकडे लागले आहे.

आंबे बहाराच्या मोसंबीची फळगळ होत असल्याने भावही पडले आहे. व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दराने ही मोसंबी खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात १२ रुपये ते १६ रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव पडत आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान मोसंबी उत्पादकांना सोसावे लागत आहे. हौशीराम मेरगळ, दादा मेरगळ, नितीन मेरगळ आदी कृषी पदविकाधारक शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देऊन मार्गदर्शन करत आहेत.ढगाळ वातावरणामुळे प्रकाश संश्लेषणाच्या दृष्टिकोनातून काही फवारण्या गरजेच्या होत्या. योग्य वेळी त्या फवारण्या झाल्या नसल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वाढला, असे मत कृषी पदविकाधारकांनी वर्तविले आहे.

आंबेबहराच्या मोसंबीचा विमा तत्काळ मिळावा...एचडीएफसी आरगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने तत्काळ दखल घ्यावी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी मोसंबीला संरक्षण मिळावे, यासाठी प्रति हेक्टर चार हजार रुपये शेतकऱ्यांचा हिस्सा भरून विमा काढलेला आहे. महिनाभरापासून फळगळ सुरू असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासन, प्रशासनाने विमा कंपन्यांना सूचना देऊन, झालेल्या नुकसानीचा विमा देण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी रामदास कावळे, प्रकाश धुमाळ, भगवानराव डोंगरे, विष्णू आटोळे, सोपान लोखंडे, प्रभाकर मोरे, रामेश्वर पडूळ यांनी केली आहे.

नुकसानभरपाई मिळावीसाडेसातशे ते आठशे मोसंबीच्या झाडावर आपल्याला ९० ते १०० टनापर्यंत मोसंबीचे उत्पादन झाले असते, असे खुद्द व्यापाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत जवळपास १६ ते १७ टन मोसंबीची फळगळ झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या भावामध्ये मोसंबी विक्री करावी लागत आहे. फळगळीमुळे १२ ते १६ रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - अनिल देशमुख, मोसंबी उत्पादक

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसJalanaजालना