शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

मजूरीचे पैसे जमा करून ठेवले, आता ज्ञानराधा सोसायटीच बंद; ठेवीदारांनी सुरू केले उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 17:57 IST

दवाखाना, अडचणीच्या काळासाठी पैसे ठेवले, आता ज्ञानराधा सोसायटीच बंद; ठेवीदारांनी सुरू केले बेमुदत उपोषण

अंबड : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेत गेल्या तीन महिन्यापासून आर्थिक देवाणघेवाण बंद आहेत. त्यामुळे ठेवीदार आर्थिक संकटात सापडलेले आहेत. ठेवी परत देण्याची मागणी करत ठेवीदारांनी आज सकाळपासून अंबड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. बँक व्यवस्थापनाकडून काही महिन्यापासून ठेवीदारांची आर्थिक कोंडी केली जात असल्याने ठेवीदारांमध्ये संताप निर्माण झाला आहे.ठेवी परत देण्याची मागणी करत ठेवीदारांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शाखा त्वरित सुरू करून रक्कम परत करावी, उपोषण स्थळी आंदोलकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांचे पासपोर्ट, मालमत्ता जप्त कराव्यात, अशा मागण्या ठेवीदार न्याय हक्क कृती समिती अंबड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. 

फसवणूक झाली विधवा मुलीचे शेती विकून आलेले पैसे ठेवले होते. मिळाले नाहीत. क्रेडिट सोसायटी कडून फसवणूक झाली आहे.- समिंद्रा डेरे 

मजुरीचे पैसे होते मोलमजुरी करून जमवलेले पैसे बचत म्हणून बँकेत ठेवले होते. व्याजदराच्या अपेक्षेपोटी गुंतवणूक केली होती. आता पैसे मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणी सापडले आहे.- कासाबाई वराडे

चिंता वाटते दवाखान्यात पैसा उपयोगी येईल या आशेमुळे येथे पैसे ठेवले. आता ठेवी परत मिळत नसल्याने चिंता आहे. - मंडाबाई वराडे 

चिंता वाटत आहे पशुधन विकून आणि बचतीची रक्कम मिळत नसल्याने आता चिंता आहे.- पद्मा रणमळे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना