शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा-विदर्भाला जोडणारा जालना-खामगाव रेल्वे मार्ग ११५ वर्षांपासून केवळ कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:25 IST

येत्या अर्थसंकल्पात रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद होईल का?

जालना : मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला जालना-खामगाव रेल्वे मार्ग आजही केवळ कागदपत्रांच्या आणि बैठकांच्या फेऱ्यात अडकला आहे. ब्रिटिश काळात १९१० मध्ये ज्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याकडे जनतेने विकासाचा नवा मार्ग म्हणून पाहिले होते. मात्र, ११५ वर्षे उलटूनही हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेला नाही. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पाची तयारी सुरू झालेली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी जालना ते खामगाव मार्गासाठी भरघोस निधीची तरतूद होईल, अशी आशा आहे.

नुकतीच केंद्रीय मंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जालना-खामगाव रेल्वे प्रकल्पावर चर्चा केली. मात्र, या नवीन मार्गाचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल, याची कोणतीही निश्चित वेळ समोर आलेली नाही. दुसरीकडे जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनीही रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यांनाही केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले आहे.

निधीअभावी प्रकल्प रखडलामराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा जालना-खामगाव रेल्वे मार्ग सध्या अधांतरी आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी निम्मा खर्च राज्य सरकारला उचलायचा आहे. राज्य सरकारने निधी देण्याची तयारी दर्शवली असली, तरी केंद्र सरकारकडून अद्याप या रेल्वे मार्गासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या थंडबस्त्यात पडला आहे. २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात जालना ते खामगाव रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु, काम संथ गतीने सुरू आहे. आणखी निधीची तरतूद झाल्यास हे काम मार्गी लागू शकेल.

इतर मागण्यापरभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामुळे रेल्वेची संख्या वाढविणे दक्षिण मध्य रेल्वेला शक्य होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेची संख्या वाढवावी, परतूर रेल्वे स्थानकावर जलदगती रेल्वेला थांबा द्यावा, बसच्या धर्तीवर मोनोरेल प्रकल्प राबवावा, अशा मागण्या जोर धरत आहेत.

रेल्वे अर्थसंकल्पाची तयारी सुरू झालेली आहे. यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. जालना ते खामगाव रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही प्रमाणात तरतूद करण्यात आली होती. परंतु, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी निधीची गरज आहे. तसेच, परतूर रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा आणि पश्चिम महाराष्ट्र व नागपूर मार्गावर रेल्वेची संख्या वाढवावी.- स्वप्नील मंत्री, अध्यक्ष, रेल्वे संघर्ष समिती.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna-Khamgaon Railway: 115-Year-Old Project Still on Paper Only

Web Summary : The Jalna-Khamgaon railway, envisioned in 1910 to connect Marathwada and Vidarbha, remains stalled despite promises. Lack of funds hinders progress, though surveys are underway. Calls grow for increased railway services and stops in the region, demanding government attention.
टॅग्स :Jalanaजालनाrailwayरेल्वे