शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अंतरवाली सराटी लाठीचार्जच्या चौकशीला झाली सुरुवात, अप्पर पोलीस महासंचालक जालन्यात

By दिपक ढोले  | Updated: September 4, 2023 15:40 IST

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अप्पर महासंचालकांची भेट घेतली आहे. 

जालना : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीला अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी सोमवारपासून सुरुवात केली आहे. त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची चौकशी केल्याचे सांगण्यात आले आहे.

अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यात अनेक आंदोलक आणि पोलिसही जखमी झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांना दिले आहेत. सक्सेना हे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी सुरुवातील विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, सीआयडीचे प्रमुख पंकज देशमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेतली. साडेअकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत त्यांनी या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व प्रकरण समजून घेतले. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.

मी चौकशी करण्यासाठी आलोमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, मी चौकशी करण्यासाठी जालन्यात आलो आहे. चौकशीला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यातील वातावरण पाहता, कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.- संजय सक्सेना, अतिरिक्त पोलिस महासंचालक

मोठी बातमी:'मला वरिष्ठांनीच लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले'; अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती

काय घडले होते ?मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. १ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिस त्यांना आणण्यासाठी पोलीस गेले होते. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हवेत गोळीबारही करण्यात आला. याचे पडसाद राज्यभरात उमटले असून, अनेकठिकाणी जाळपोळ झाली. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. तर अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे आणि डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना