शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण पालकमंत्री अतुल सावेंच्या मध्यस्थीने स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 3:58 PM

सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनास उपोषणकर्ते भगवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेतले. 

- अशोक डोरलेअंबड: तालुक्यातील जामखेड येथे धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणीकरिता सुरू असलेले आमरण उपोषण आज सकाळी बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले.  पालकमंत्री सावे, मंत्री संदिपान भूमरे,आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक आयुष नोपानी,तहसीलदार चंद्रकांत शेळके, स्था.गु शा पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ यांनी उपोषणार्थीची भेट घेवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनास उपोषणकर्ते भगवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेतले. 

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी यासाठी दि.५ नोव्हेंबरपासून अंबड तालुक्यातील जामखेड येथे बेमुदत साखळी उपोषण सुरु केले होते. मात्र सरकारने आरक्षणाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्याने  १७ नोव्हेंबरपासून भगवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. गुरुवारी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार, उपविभाग अधिकारी श्रीमंत हरकर,उपविभागीय अधिकारी  दीपक पाटील,तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषण स्थगित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला परंतु, उपोषणकर्ते पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पुढील निर्णय घेण्याच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर शुक्रवारी आमदार गोपचंद पडळकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आ.पडळकर,धनगर आरक्षण अभ्यास समितीचे अॅड.पाचपोळ यांनी आरक्षण प्रक्रियेची माहिती उपोषणार्थीना दिली. 

दरम्यान, आज सकाळी आज सकाळी बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे, मंत्री संदिपान भूमरे,आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक आयुष नोपानी,तहसीलदार चंद्रकांत शेळके, स्था.गु शा पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ यांनी उपोषणार्थीची भेट घेवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच सरकार धनगर समाजाच्या आरक्षण तसेच इतर विषयावर सकारात्मक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच धनगर समाजाच्या प्रतिनिधी समवेत बैठक घेणार, असे आश्वासन दिले. त्यानंतर गवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी उपोषण स्थगित केले.

उपोषणार्थी भगवान भोजने यांनी धनगर आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अभ्यास समितीकडून एक महिन्यात अहवाल घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत सरकारकडून सकारात्मक व तत्परतेने सहकार्य करण्यात यावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कारवाई लवकर करावी, समाजासाठी जाहीर योजनांसाठी आर्थिक तरतूद करावी, जालना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी तात्काळ जागेचे हस्तांतरण स्मारक समिती कडे करण्यात यावे, यासह अन्य विषयावर सरकारकडून लेखी आश्वासन घेत उपोषण स्थगित करण्याचे घोषित केले. यावेळी सरपंच अॅड.रतन तारडे, रामभाऊ लांडे,अॅड.अशोक तारडे, अॅड. मंजित भोजने, डॉ.गंगाधर पांढरे,बळीराम खटके, कपिल दहेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :JalanaजालनाDhangar Reservationधनगर आरक्षण