शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
6
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
7
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
8
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
9
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
10
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
11
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
12
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
13
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
14
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
15
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
16
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
18
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
19
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
20
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:25 IST

"आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, आम्ही शांततेत येणार आहोत आणि शांततेतच आरक्षण घेणार आहोत. कुणीही आडवा येऊ दे, आम्ही मुंबईत जाणारच.".

- पवन पवारवडीगोद्री (जालना): मराठा आंदोलक मुंबईत यावेत आणि त्यांच्यात दंगल घडून यावी अशी सरकारचीच इच्छा आहे. सरकारच मराठ्यांच्या अंगावर आग फेकू पाहत आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. शनिवारी अंतरवली सराटी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा संशय व्यक्त केला.

जरांगे पाटील म्हणाले की, "आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, आम्ही शांततेत येणार आहोत आणि शांततेतच आरक्षण घेणार आहोत. कुणीही आडवा येऊ दे, आम्ही मुंबईत जाणारच.". जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "जेव्हा आम्ही शांततेत अंतरवलीत बसलो होतो, तेव्हा आम्हाला मारहाण करण्यात आली. आमच्यातच रक्तपात घडवला गेला. येवल्याच्या लोकांना हाताशी धरून आमच्यातच भांडणं लावली गेली, मग दंगल घडवण्याचा संशय आम्हाला का येऊ नये?"

सरकारला दंगल घडवायची आहेते पुढे म्हणाले, "मराठ्यांना कळलं आहे की सरकार जाणूनबुजून मराठ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळेच ते संतप्त झाले आहेत. 'पोलिस बघून घेतील' म्हणजे काय? हा दंगल घडवण्याचा दुसरा प्रयत्न नाही तर काय आहे? आम्ही शांततेत मुंबईला येऊ नये का? आझाद मैदानात बसून उपोषण करू नये का?"

'जाळपोळ करणारे आमचे नाहीत'जरांगे पाटील यांनी जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. "हे लोक आमच्यात घुसून घोषणा देतील. त्यांचेच लोक देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देतील. जाळपोळ आणि दगडफेक करणारे आमचे नाहीत. पोलिसांनी त्यांना ताबडतोब पकडावे," असेही जरांगे म्हणाले.

मुंबई न्याय देणारी भूमी"आम्ही न्यायासाठी मुंबईत येत आहोत. उलट, तुम्ही आम्हाला पाणी दिलं पाहिजे. मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे," असे जरांगे यांनी सांगितले. "२९ ऑगस्टला आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गणेशोत्सव आपल्या धर्माचा आहे. आम्ही आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी मुंबईत येत आहोत. मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे. गणेशोत्सव आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. आम्ही उत्सवाचा आनंदही घेऊ," असे ते म्हणाले.

सरकारचे लोक काहीही बातम्या पसरवतातते म्हणाले की, आम्ही आमचे गणपती बाप्पा तिथेच आणत आहोत आणि मुंबईकर आणि ग्रामीण महाराष्ट्रातील लोक एकत्र येत असल्याने असा सोहळा जगात कधीच होणार नाही. "आम्ही मराठे हिंदूंचे सगळे संस्कार पाळतो आणि वारकरी संप्रदायाचे पालन करतो. गणेशोत्सव आमच्या मुलांच्या सुखासाठी आहे, आणि आरक्षणही मराठ्यांच्या मुलांच्या सुखासाठी आहे. सरकारचे लोक काहीही बातम्या पसरवतात," असेही जरांगे म्हणाले. मुंबईकरांना प्रश्न विचारताना ते म्हणाले, "आमची काय चूक आहे? आम्ही तुमचीच लेकरं आहोत. गरिबांची लेकरं तुमच्या दाराशी येत आहेत." चार महिन्यांपूर्वी जेव्हा मुंबईला जाण्याची तारीख ठरली, तेव्हा गणेशोत्सव आहे, याची कल्पना नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMarathwadaमराठवाडाMaratha Reservationमराठा आरक्षण