शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले"; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 19:46 IST

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी मराठा महिलांनी अडवली.

वडीगोद्री ( जालना) : सरकारने खोटे आश्वासन देऊन एका पद्धतीने फसवणूक केल्याची मराठा समाजाची मानसिकता तयार झाली आहे. सरकारने तातडीने मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेऊन तातडीने पावलं उचलली पाहिजेत, असे आवाहन धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. खासदार निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी आज दुपारी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर उपोषण असलं तरी पाणी घेणे गरजेचे आहे, अशी विनंती जरांगे यांना खासदार निंबाळकर यांनी केली. 

पुढे खासदार निंबाळकर म्हणाले, प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे नेणं योग्य वाटत नाही. जरांगे हे समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत. या माणसाचा अखंडपणे समाजासाठी लढा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकारण म्हणून बघितलं नाही पाहिजे. केंद्र सरकारला मी वारंवार विनंती करतो की, तामिळनाडू भारतातील राज्य असून तिथे ५० टक्केची आरक्षण मर्यादा ओलंडली आहे, ते आरक्षण टिकतं आपल्याकडे का टिकू शकत नाही ? सगळं समजून सुद्धा असा प्रकार केला जातो. तो चीड आणणार आहे. यामुळे समाजात रोष निर्माण होतो. याबाबत सरकारने मार्ग काढावा यासाठी पूर्ण ताकतीने आम्ही मागे लागू असे आश्वासनही खासदार निंबाळकर यांनी यावेळी दिले.

मराठा महिलांनी अडवली खासदार निंबाळकर यांची गाडीअंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी मराठा महिलांनी अडवली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडून मराठा आरक्षण देण्यास भाग पाडावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणomraje nimbalkarओमराजे निंबाळकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना