शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

चिमुकलीचा वाढदिवस सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरपले, मुलांच्या नशिबी आईसारखाच संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:08 IST

खेळण्याच्या वयात आई-वडिलांना आणि आता क्रिकेट खेळताना पतीला गमवावे लागल्याने महिलेवर दुःखाचा डोंगर

- फकिरा देशमुख/रऊफ शेखभोकरदन : काही जणांच्या पाचवीलाच संघर्ष, दु:ख पुजलेले असते. अशा व्यक्तींना एकापाठोपाठ एक संकटांना सामोरे जावे लागते, जीवनाशी झगडावे लागते. असेच दु:ख लहानेवाडी (ता. फुलंब्री) येथील एका माऊलीच्या वाट्याला आले. एक वर्षाच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्याची तयारी चालू असतानाच पतीचा मृत्यू झाला. खेळण्याच्या वयात आई-वडिलांना आणि आता क्रिकेट खेळताना पतीला गमवावे लागले.

घरी मुलीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी असतानाच सोमनाथ चंद्रभान बहादुरे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना १६ जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी एक वाजता लहानेवाडी (ता. फुलंब्री) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमनाथ यांच्या अकाली निधनाने त्यांचा मुलगा आर्यन (वय ५) व मुलगी काव्या यांच्या डोक्यावरची पितृत्वाची छाया हरपली आहे. पत्नी कावेरी बहादुरे यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भोकरदन शहरात पंचायत राज चषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. सोमवारी रात्री आठच्या सुमारास क्रिकेट सामन्यावेळी सोमनाथ बहादुरे हे गोलंदाजी करताना मैदानावरच कोसळले होते. त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमनाथ यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

मुलांच्या नशिबी तेच आलेसोमनाथ बहादुरे यांची पत्नी कावेरी यांच्या नशिबी संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कावेरी या १० वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्या १३ वर्षांच्या असताना वडिलांचे छत्र हरपले, तसेच त्यांचे दोन भाऊदेखील पोरके झाले आहेत. त्यांचा सांभाळ आईच्या आईने केला.

सुखाचे दिवस येत असताना घातकावेरी यांचे लग्न सोमनाथ बहादुरे यांच्यासोबत झाले. सोमनाथ यांच्या घरची परिस्थिती हलाखीचीच होती. आई-वडील व भाऊ मिळून दीड एकर कोरडवाहू शेतजमीन असल्याने कसे भागणार, म्हणून सोमनाथ बहादुरे यांनी शिक्षण झाल्यानंतर खासगी कंपनीत नोकरी मिळवली. यानंतर त्यांना एका फायनान्स कंपनीत समाधानकारक पगाराची नोकरी मिळाली. भोकरदन शहरात भाड्याची खोली घेऊन पत्नी कावेरी, मुलगा आर्यन व मुलगी काव्या यांच्यासह वास्तव्यास होते. नेमके त्यांना सुखाचे दिवस येत असल्याचे दिसतानाच सोमनाथ यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे आता पुढे जगावे कसे, असा प्रश्न कावेरी बहादुरे यांच्यासमोर उभा राहिला आहे. सोमनाथ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

रुग्णवाहिका आल्यानंतर आक्रोशसोमवारी सोमनाथ बहादुरे यांचा मृत्यू झाल्याचे पत्नी कावेरी बहादुरे यांना कळविण्यात आले नाही. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असल्याचे नातलग व मित्रपरिवाराने कावेरी बहादुरे यांना सांगितले होते. मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान ‘सोमनाथला भेटण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगरला जाऊ,’ म्हणून घरमालक व नातेवाईक कावेरी, मुलगा आर्यन व मुलगी काव्या यांना सोबत घेऊन निघाले. मात्र, फुलंब्रीजवळ वाहन लहानेवाडीकडे वळले, तेव्हा कावेरीबाई यांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांनी ‘माझ्या पतीला काय झाले आहे, हे सांगा,’ असे म्हणत हंबरडा फोडला. त्यानंतर दारात सोमनाथ यांचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका आल्यानंतर एकच आक्रोश झाला.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाJalanaजालनाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर