शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पित्यानेच केले साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:18 IST

शहरातील कांचननगर परिसरातील घटना, कदीम पोलिसांची कारवाई

जालना : साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या पित्याला कदीम जालना पोलिसांनी अकोला शहरातून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी सकाळी केली आहे.

शहरातील कांचननगर भागातील एका ३७ वर्षीय महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झालेली आहे. ती सध्या साडेपाच वर्षाची आहे. या पती-पत्नीत आपसांत वाद होत असल्याने त्यांनी न्यायालयामार्फत घटस्फोट घेतला आहे. घटस्फोट मंजूर करतांना न्यायालयाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे दिला आहे. वडिलांना दरमहिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी ३ ते ५ वेळेत कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात मुलीला भेटण्याची परवानगी दिलेली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर मुलीग  व्हॅनमधून नेहमीप्रमाणे घरी येत होती. स्कूल व्हॅनमधून उतरल्यानंतर घराजवळून त्या मुलीचे एका कारमधून आलेल्या तिघांनी अपहरण केले.  याप्रकरणी  कदीम ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली होती.  पोलिसांनी लहान मुलीच्या अपहरणाचा प्रकार असल्याने ही घटना गांभीर्याने घेत तातडीने सूत्रे हलविली असता, मुलीचे अपहरण तिच्या पित्यानेच केल्याचे समोर आले.

यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस अंमलदार रामेश्वर राऊत, दिलीप गायकवाड, शुभदा पाईकराव यांचे एक पथक अकोल्याला रवाना झाले. या पथकाने रात्रीच अकोला गाठून मुलीचे वडील योगेश परमार याचे घर गाठले. मात्र तो घरी आढळून आला नाही. त्यानंतर अकोला शहरातील सर्व हॉटेलची तपासणी केली असता, एका प्रशस्त हॉटेलमध्ये तो आढळून आला. येथून मुलीची सुटका करून, योगेश परमार यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना