विजय मुंडे लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दोन वर्षापूर्वी जालना नगरपालिकेचे महानगर पालिकेत रूपांत झाले. प्रथम होणाऱ्या मनपा निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजप, शिंदेसेनेने जोर लावला आहे. महायुतीचा निर्णय झाला नसला तरी सत्ता आमचीच अन् महापौरही आमचाच असा दावा केला जात आहे. दुसरीकडे नगरपालिकेत १० वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.
जालना महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढली जावी, यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत; परंतु मित्रपक्षांत इच्छुकांची संख्या दीडशेवर आहे. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीवर शिक्कामोर्तब होईल का? असा प्रश्न आहे. विरोधी पक्षातील अनेक स्थानिक पदाधिकारी पक्षात आल्याने स्वबळाची भाषाही बैठकांमध्ये केली जात आहे. दुसरीकडे नगरपालिकेत सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा ठरणार असून, मविआची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकूण प्रभाग किती आहेत? - १६ एकूण सदस्य संख्या किती? - ६५
कोणते मुद्दे निर्णायक?
१. जालना शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा. घंटागाड्यांचे बिघडलेले वेळापत्रक. शहरातील विविध भागांतील अस्वच्छतेमुळे वाढणारी रोगराई.
२. ओपन स्पेसवर होणारी अतिक्रमणे, बगिच्यांचा अभाव, अंतर्गत भागातील खराब झालेले रस्ते, वाढीव वस्त्यांवर रस्त्यांसह इतर असलेल्या मूलभूत समस्या आदी मुद्यांवर सर्वपक्षीयांकडून निवडणूक लढविली जाईल.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप - ११शिवसेना - ११राष्ट्रवादी काँग्रेस - ०९काँग्रेस - २८मनसे - ००इतर - ०२
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण - २,११,३७८पुरुष - १,१०,५२१महिला - १,००,८२९इतर - २६
आता एकूण किती मतदार ?
एकूण - २,४५,९२९पुरुष - १,२८,८९४महिला - १,१७,००१इतर - ३४
बंडखोरी रोखणे आव्हानच
महानगरपालिका निवडणुकीसाठी ज्येष्ठांसह शेकडो युवक इच्छुक आहेत. त्यामुळे बंडखोरी रोखणे हे नेत्यांसमोर आव्हान राहणार आहे.
Web Summary : Jalna's upcoming municipal elections see the BJP-Shinde Sena alliance vying for power against a strong Congress. Seat sharing talks are tense due to numerous aspirants. Water issues, sanitation, and infrastructure will be key deciding factors. Preventing rebellion among hopeful candidates poses a significant challenge.
Web Summary : जालना के आगामी नगर निगम चुनावों में भाजपा-शिंदे सेना गठबंधन का मुकाबला मजबूत कांग्रेस से है। सीटों के बंटवारे पर बातचीत तनावपूर्ण है क्योंकि कई उम्मीदवार हैं। पानी की समस्या, स्वच्छता और बुनियादी ढांचा प्रमुख निर्णायक कारक होंगे। उम्मीदवारों के बीच विद्रोह को रोकना एक महत्वपूर्ण चुनौती है।