शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा, ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 07:04 IST

जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये कडकडीत बंद

वडीगोद्री (जि. जालना) : वडीगोद्री येथे ओबीसींचे उपोषण सुरू असून, येथूनच अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण उपोषणस्थळी रस्ता जातो. वडीगोद्री येथील उपोषणस्थळ परिसरात गत दोन दिवसांपासून मराठा, ओबीसी आंदोलक एकत्र येत घोषणाबाजी करीत आहेत. यामुळे शनिवारी दुपारी मोठा तणाव निर्माण झाला होता. अंतरवालीचा रस्ता बंद असल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्गावर अर्धा तास ठिय्या मांडला. दरम्यान, जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आज बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. 

आंदोलक आमनेसामने आले व जोरदार घोषणाबाजी झाली. त्यातच अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता बंद केल्यानंतर मराठा बांधवांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येऊन घोषणाबाजी करीत ठिय्या मांडला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलक बाजूला झाले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मराठा व ओबीसी आंदोलनातील समन्वयकांची बैठक घेतली.

जरांगे पाटील यांनी घेतले उपचार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी चांगलीच ढासळली होती. 

या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर, शंभुराज देसाई यांनी जरांगे पाटील यांच्याशी मोबाइलवर संवाद साधला. 

एक-दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास जरांगे पाटील यांनी सलाइन लावून घेत उपचार घेतले. 

पोलिसांचा बंदोबस्त

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून एसआरपीएफची एक कंपनी, दंगा नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्सची एक कंपनी, १२ अधिकारी, १० वाहतूक पोलिस कर्मचारी आणि ४० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

कायद्याच्या महाराष्ट्रात दहशत निर्माण करण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही. जरांगेंचे दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जरांगेंनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल.-लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणJalna Policeजालना पोलीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील