शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

बॅनर फाडले, आम्ही कपडे फाडू; मनोज जरांगे-पाटील यांचा मंत्री, आमदारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 08:16 IST

जरांगे पाटील यांना रविवारी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे आले.

वडीगोद्री (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे जे घडलं ते चुकीचं आहे.  तेथील मंत्री आणि आमदारांची मस्ती आहे. त्यांनी तर फक्त आमचे बॅनर फाडले, आम्ही त्यांचे कपडे फाडू शकतो, मी मराठा समाजाला शांत ठेवलंय, हुं जरी म्हटलं तर तुमची पूर्ण जिरवील,  असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.    

जरांगे पाटील यांना रविवारी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे आले. सोमवारी सकाळी ते म्हणाले की, सामान्य मराठ्यांनी मनावर घेतले तर त्यांना आयुष्यभर गुलाल लागणार नाही. विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या हातात कायदा नाही. कोणतीही शक्ती  मराठ्यांना आरक्षणापासून रोखू शकत नाही.  

ज्या नोंदी सापडल्या त्यावरून मराठा कुणबी एकच आहे, असा अहवाल तयार केला जात आहे. त्याबाबत कायदा मंजूर करून राज्यभरात सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही.  - मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलनाचे नेते  

काय म्हणाले जरांगे पाटील?बीड येथील अधिकारी मराठ्यांच्या पोरांना जाणूनबुजून टार्गेट करीत आहे.  मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी  बीडच्या प्रकरणात लक्ष घालावे. गोरगरीब मराठ्यांची आंदोलन करणारी पोरं गुंतविली जात आहेत. हे तुम्ही दोन दिवसांत थांबवा नसता नाइलाजाने बीड जिल्हा रस्त्यावर उतरेल. 

ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे थांबवावे!ओबीसींच्या संवैधानिक अधिकाराचे संरक्षण करण्याचा अधिकार ओबीसी नेत्यांनाही आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटील हे वारंवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करून मराठा व ओबीसींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे योग्य नाही, अशी नाराजी व्यक्त करत ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोमवारी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण