शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कर वसुलीचा डोंगर; जालना नगरपालिकेची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:57 PM

नगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीचा आकडा वाढण्याऐवजी थकबाकी वाढत आहे. तब्बल साडेएकवीस कोटींवर गेलेला थकबाकीचा डोंगर सर करताना अधिकारी व कर्मचा-यांची दमछाक होत आहे.

बाबासाहेब म्हस्के/जालना : नगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीचा आकडा वाढण्याऐवजी थकबाकी वाढत आहे. तब्बल साडेएकवीस कोटींवर गेलेला थकबाकीचा डोंगर सर करताना अधिकारी व कर्मचा-यांची दमछाक होत आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीच्या उद्दिष्ट पूतीसाठी वरिष्ठ अधिका-यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.शहरातील मालमत्तांच्या फेरमूल्यांकनाची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात असून, नवीन मालमत्तांचेही सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीच्या आकड्यात वाढ होणार आहे. सध्या नगरपालिकेच्या कर विभागाकडे सुमारे ४४ हजार मालमत्तांची नोंद आहे. शहरातील मालमत्ता धारकांकडे चालू वर्षातील व जुनी असा एकूण २१ कोटी २२ लाख २८ हजारांचा कर थकला आहे. मालमत्ता, शिक्षण, पाणीपट्टी, रोहयो, वृक्ष व अग्निकराचा यात समावेश आहे. मालमत्ता कर थकविणा-यांमध्ये अनेक बड्या लोकांचा समावेश आहे. तसेच शासकीय कार्यालयांकडे नगरपालिकेचा सुमारे साडेतीन कोटींचा कर थकला आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्याकडे असलेल्या थकबाकीचा आकडाही मोठा आहे. कर वसुलीचे प्रमाण कमी असल्याने शहरातील विकास कामांवरही परिणाम होत असून शासकीय योजनांमधील लोकसहभागातून वाटा भरणे कठीण होत आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल, देखभाल दुरुस्ती खर्च भागविताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मार्चअखेर कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी नगरपालिकेच्या कर विभागाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती सुरू केली आहे. जप्त मालमत्तांवर पालिकेचे नाव लावून त्याचा लिलाव केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. जप्ती कारवायांमुळे मालमत्ता कर वसुलीचा आकडा प्रथमच ३५ टक्क्यांवर गेला आहे. तुलनेत पाणीपट्टीची वसुली केवळ दहा टक्यांवरच अडकली आहे. ३१ जानेवारीअखेर कर वसुलीचे एकूण टक्केवारी १९.६२ टक्के इतकी आहे. अ वर्ग असलेल्या जालना पालिकेला कर वसुली वाढविण्यासाठी थेट विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.------------वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर वसुली विभागाकडून पुरेपूर प्रयत्न सुरू असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची थेट जप्ती करून लिलाव करण्यात येणार आहे. जप्ती कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपल्याकडील कर भरून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे.-संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, जालना.