शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

सुरंगळीतील जांभूळांचा राज्यभर गोडवा; शेतकरी कुटुंबाने ३ एकरात घेतले ३० लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:35 IST

पुणे, अमरावती, जालना, औरंगाबादच्या बाजारपेठेत मागणी वाढली

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना):  तालुक्यातील सुरंगळी येथील सपकाळ या शेतकरी कुटुंबाने जांभूळ बाग लागवडीचा प्रयोग यशस्वी करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. तीन एकरातील केवळ 150 झाडातून सपकाळ कुटूंबाला तब्बल 30 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या जांभळाचा गोडवा राज्यभर पसरला असून वाढती मागणी आहे. केवळ जाभळाच्या उत्पादनातून शेतकऱ्याची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे. 

भोकरदनपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या  सुरंगळी येथील कौतिकराव विठ्ठल सपकाळ  आणि त्यांच्या  भावंडांनी २००८ मध्ये बारामती येथील जांभळाची रोपे आणली. २० बाय ३० या अंतरावर तीन एकरांत त्यांची लागवड केली. त्यावेळी अनेकांनी या जांभूळ बागेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सपकाळ कुटुंबाने विविध अडचणींवर मात करून बागेची जोपासना केली. बाग वाचविण्यासाठी पाणीटंचाई निर्माण झाल्याने सपकाळ कुटुंबाने  २०१६ मध्ये तीन किलोमीटर अंतरावरील जुई धरणात विहीर खोडून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी आणले. बाग जगली मात्र जांभळातून उत्पादन कमी असल्याची सल्ले देत अनेकांनी सपकाळ कुटूंबाला वेड्यात काढले. 

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून या जांभूळ बागेने सपकाळ कुटूंबाचा कायापालट केला आहे. या बागेतून पंधरा ते विस दिवसांपासून उत्पादन सुरू झाले आहे. दररोज 10 क्विंटल जांभूळ अमरावती, पुणे, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणच्या बाजारपेठत विक्रीसाठी जात आहेत. हे जांभूळ चविष्ट व दर्जेदार असल्याने ग्राहकातून अल्पवधीत मागणी वाढली. त्यामुळे व्यापारी या जांभळाची खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. 

निव्वळ नफा २५ लाख मिळेल आत्तापर्यंत बागेची पाच वेळा हार्वेस्टिंग करण्यात आली असून 13 ते 14 लाखाचे उत्पादन हातात आले आहे. आणखी पंधरा ते पंचवीस दिवस या बागेतून उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे एकूण 30 ते 32 लाख रुपये उत्पादन या वर्षी मिळेल. त्यातून पाच लाख रुपये खर्च वजा केला सात निव्वळ नफा 25 लाख मिळेल. फवारणीपासून ते खताची मात्रा कोणती द्यावी याबाबत योगेश जाधव यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे फळांचे वजन २५ ते ३० ग्रॅमपर्यंत आले आहे. - कौतीक विठ्ठल सपकाळ, प्रगतीशील शेतकरी

मजुरांना रोजगार मिळालासपकाळ यांच्या जांभुळ बागेमुळे सुरंगळी, कल्याणी परिसरातील 25 ते 30 मजुरांना एक महिनाभर जांभूळ तोडण्यासाठी काम मिळाले आहे. सपकाळ कुटुंबातील सदस्यांनी जांभूळ बागेतून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जांभूळापासून ज्युस, बियापासून पावडर तयार सुद्धा करता येते. त्याला सुद्धा चांगली मागणी आहे. - रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती