लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील धाकलगाव शिवारातील तीन एकर मधील ऊस रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत खाक झाला. यामुळे शेतक-यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.धाकलगाव येथील नाथा येसू रोटे व बापू देविदास रोटे यांचा गट क्रमांक २७० मधील प्रत्येकी दीड एकर उसाला रविवारी रात्री अकराच्या सुमारास वाजता अचानक आग लागली. ृआग लागली तेव्हा विजेचे भारनियमन सुरू होते. त्यामुळे कोणी तरी खोडसाळपणे ही आग लावली असावी, असा संशय शेतकरी बापू रोटे यांनी व्यक्त केला. या भागात उसाला आग लागण्याचा घटना या पूर्वीही घडल्या आहेत.
३ एकरांतील ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:51 IST