शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:43 IST

नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ९७ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन, हा निधी तातडीने शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती विहित वेळेत संकलित करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.दुष्काळी निधी वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तसेच क्रीडा विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के. राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर, तहसीलदार बिपीन पाटील, कदम, सुमन मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी खतगावकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, २०१८ च्या खरीप हंगामात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना मदतीची रक्कम दोन टप्यात देण्यात येणार आहे. राज्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ९०० कोटी आणि दुसºया टप्प्यात २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही नुकतीच राज्याला दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ७१४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्यात वितरित करण्यात आला आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये कमाल २ हेक्टरपर्यंत मदत, कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रथम हप्ता ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या दराने ५० टक्के म्हणजे ३ हजार ४०० रुपये बहुवार्षिक पिकांसाठी प्रथम हफ्ता ८ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने ५० टक्के म्हणजे ९ हजार रुपये प्रत्येक शेतकºयांना ही भरपाई मिळेल.१५ दुष्काळी अनुदान वाटपासंदर्भात जालना जिल्ह्यातील ८५४ गावातील ७५ हजार ४३३ लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून ४० हजार ७९१ शेतक-यांच्या खात्यावर १५ कोटी ९५ लक्ष ४९ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती संकलित करण्यात येत असून, आजपर्यंत जिल्ह्यातील ९७१ गावांपैकी ३७८ गावातील एक लाख ४० हजार ९२३ शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी यावेळी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळBabanrao Looneykarबबनराव लोणीकर