शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एसटीला ५० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:46 IST

आषाढी एकदशी निमित्त परिवहन महामंडळाकडून जिल्हाभरातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. परिणामी जालना विभागाला याचा चांगलाच फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विभागाला ५० लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आषाढी एकदशी निमित्त परिवहन महामंडळाकडून जिल्हाभरातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. परिणामी जालना विभागाला याचा चांगलाच फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विभागाला ५० लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.आषाढी एकादशीनिमित्त जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला जातात. त्यांच्या सवयीसाठी एसटी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.मागील वर्षीही महामंडळाने १५० गाड्यांचे नियोजन केले होते. त्यापैकी १३० च गाड्या रस्त्यावर धावल्या. या गाड्यांच्या १,१२० फेऱ्या झाल्या.या गाड्यांनी ३ लाख १८ हजार किलोमीटरचे अंतर पार केले. यातून महामंडळाला ८४ लाख ४९ हजारांचे उत्पन झाले. त्यानुसार यावर्षीही महामंडळाकडून जालना, परतूर, अंबड, जाफराबाद या बसस्थानकातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. यापैंकी फक्त १२५ च बसेस रस्त्यावर धावल्या. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आंदोलन पुकारले होते.परिणामी, यावर्षी जालना विभागाच्या फक्त ३६८ बस फे-या झाल्या. तसेच या गाड्यांनी १ लाख ५ हजार ९४७ किलोमीटर अंतर पार केले.यातून ३५ लाख २९ हजारांचे उत्पन्न जालना विभागाला मिळाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जालना विभागाला तब्बल ५० लाख २० हजारांचे नुकसान सोसावे लागले आहे.राजूर यात्रा : ५ लाखांचे उत्पन्नअंगारकी एकदशी निमित्त राजूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांच्या सवयी साठी महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. या गाड्या जालना, परतूर, जाफराबाद, अंबड येथील बसस्थानकांतून सोडण्यात आल्या. या गाड्यांनी ४२८ फे-या केल्या असून, त्या १७ हजार ३९० किलोमीटर धावल्या. यातून महामंडळाला ५ लाख ९७ हजार ३१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात जालना बसस्थानकातून १८० फे-या झाल्या असून, १ लाख ९५ हजारांचे उत्पन्न, तसेच जाफराबाद ५२ फे-या, ७४ हजार ५४८ उत्पन्न, परतूर ४८ फे-या, ५२ हजार ४७५ रुपयांचे उत्पन्न, अंबड १४८ फे-या, २ लाख ७४ हजार ४९२ रुपयांचे उत्पन्न झाले आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaratha Reservationमराठा आरक्षण