शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

जालन्यात आस्मानी कहर सुरूच; गोळेगावला 'गोदावरी'चा विळखा, ग्रामस्थांना लोणीत हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:21 IST

कोणी पाण्यातून वाट काढली, कोणी ट्रॅक्टरचा आधार घेतला

जालना/ परतूर : अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आल्याने गोळेगाव (ता. परतूर) गावात सोमवारी रात्री पाणी शिरले होते. प्रशासनाने गावातील १३०० वर नागरिकांना सुरक्षितरित्या लोणी गावातील समाज मंदिर, जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केल्याने अनर्थ टळला. गत २२ दिवसांत सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जालना जिल्ह्याच्या विविध भागात गत आठवड्यापासून पावसाचा जोर अधिक वाढत आहे. जिल्ह्यात सोमवारी, मंगळवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि पडणारा पाऊस यामुळे गोदावरी नदी दुथडी वाहत आहे. या गोदावरी नदीच्या काठी असणाऱ्या गोळेगाव गावात सोमवारी रात्री अचानक पाणी शिरले. ही माहिती मिळताच नागरिकांनी लेकराबाळांसह गावाबाहेर पडणे सुरू केले. आ. बबनराव लोणीकर, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसीलदार प्रतिभा गोरे, गटविकास अधिकारी राजेश तांगडे व इतरांनी गावात धाव घेऊन नागरिकांना एकएक करून गावाबाहेर पडण्यास सांगितले. रात्री उशिरापर्यंत १३०० वर नागरिकांना लोणी गावातील शाळा, समाज मंदिरात हलविण्यात आले. नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकही नियुक्त करण्यात आले होते. शिवाय अन्नपाण्याची सोयही प्रशासनाकडून करण्यात आली होती. पाणी ओसरल्यानंतर काही नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी गावात परतत घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते.

कोणी पाण्यातून वाट काढली, कोणी ट्रॅक्टरचा आधार घेतलागावाला अचानक पाण्याचा वेढा पडल्याने एकच गोंधळ उडाला होता. युवकांनी पाण्यातून वाट शोधत लोणी गाव गाठले. तर ज्येष्ठांसह महिला, मुलांना ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेर काढण्यात आले. अनेकांनी लोणी गावात आसरा घेतला. तर काहींनी पाहुण्याराहुळ्यांकडे जाणे पसंत केले.

प्रशासनाकडून आवश्यक ती मदतगोळेगाव गावात पाणी शिरल्याची माहिती होताच विविध प्रशासकीय विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावात धाव घेत ग्रामस्थांना सुरक्षितरित्या गावाबाहेर काढले. त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. शिवाय अन्नपाण्यासह इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली. पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत.

पाच महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत २६.६ मिमी पाऊस झाला असून, पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात सातोना मंडळात ६७ मिमी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव आणि अंतरवली मंडळात प्रत्येकी ८६ मिमी पाऊस झाला आहे. रांजणी महसूल मंडळात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

१२६ टक्के पाऊसजिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या १२६ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासकीय दप्तरी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १३१.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरJalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र