शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:56 IST

जायकवाडीच्या डाव्या काळव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी दुपारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी / सुखापुरी : जायकवाडीच्या डाव्या काळव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी जालना वडीगोद्री राज्य महामार्गावरील शहापूर येथे गल्हाटी संघर्ष समिती व शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी दुपारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यंदा बारसवाडा परिसरात अल्प प्रमणात पाऊस पडला आहे. यामुळे हा प्रकल्प मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला असून येथे पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या प्रकल्पावर पाणी असल्यास पंचक्रोशीतील ५० ते ६० हजार नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.तसेच या परिसरात मोठ्या प्रमणात फळबागा आहेत. परंतु, पाण्याअभावी त्या संकटात सापडल्या आहेत. विहिरी व बोअरने तळ गाठला आहे. यामुळे या प्रकल्पात पाणी सोडल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.या पूर्वीही संघर्ष समितीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जायकवाडी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभाग औरंगाबाद यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याने याचा कोणाताही फायदा झाला नाही. असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू सुरू असल्याने मंडळ अधिकारी दिवाकर जोग्लादेवीकर यांना निवेदन देऊन नागरिकांनी आंदोलन मागे घेतले आहे. यापुढे तातडीने प्रकल्पात पाणी सोडले नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही मंडळाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू माईंद, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश काळे, पं. स. सदस्य राईज बागवान, शहापूरचे सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.मंगरूळ बंधाºयात पाणी सोडण्यासाठी दोन ठिकाणी उपोषणतीर्थपुरी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून मंगरूळ बंधाºयात तात्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी सकाळपासून बानेगाव येथील गोदावरी पात्रात, पंचायत समिती सदस्य शीतल उढाण व ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे.तसेच याच मागणीसाठी सीआर. ८७ कोळतेवाडी परिसरात सर्वपक्षीय शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मंगरूळ बंधा-यात जायकवाडीच्या डाव्या किंवा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी दोन्ही ठिकाणी बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.कोळतेवाडी येथे उपोषणाला बसलेल्यांमध्ये रामसगाव, शेवता, जोगलादेवी, लिंगसेवाडी, सौंदलगाव, विठ्ठलनगर, भोगगाव, राहेरी, बोरगाव, बाणेगाव गंगा आदी गावांमधील नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरण