शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राजुरात ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:50 IST

ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी केलेल्या गव्हात रासायनिक खताचे मिश्रण आढळल्याचा प्रकार राजूर येथे समोर आला. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले.समाजातील गोरगरीब घटकासाठी शासनाकडून स्वस्त धान्य योजना राबवण्यात येते. राजूर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ८९ मध्ये काही शिधापत्रिकाधारकांनी गहू खरेदी केला. खरेदी केलेल्या गव्हामध्ये रासायनिक खताचे मिश्रण असल्याचे आढळून आले आणि शिधापत्रिका धारकांत खळबळ उडाली. शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच गोरगरिबांना निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले होते.यावेळी तालुकाध्यक्ष बळीराम पुंगळे यांनी स्वस्त धान्य पुरवठादाराची चौकशी करावी, राजूर येथील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी केली. दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनात जि. प. सदस्य कैलास पुंगळे, बळीराम पुंगळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.वैजीनाथ ढोरकुले, विष्णू सानप, जगन पवार, राजू पुंगळे, भरत पुंगळे, गजानन जुंबड, सुधाकर पिंपळे, भागाजी भाडळकर, माधवराव भालेराव, नाना पवार, तुळशीराम जुंबड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनAgriculture Sectorशेती क्षेत्रSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना