शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:46 IST

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी जालना-बीड रोडवर मठपिंपळगाव पाटी येथे घडली. अपघात होताच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड / मठपिंपळगाव : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी जालना-बीड रोडवर मठपिंपळगाव पाटी येथे घडली. अपघात होताच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.नागरिकांनी झाड, दगड आडवे टाकून रस्ता बंद केल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील संभाव्य अनर्थ टळला.बुधवारी दीड वाजेच्या सुमारास जालना येथील नूतन वसाहत येथील रहिवासी दिलीप उजाड (६०) हे आपल्या दुचाकीने (एम. एच. २०-ए एक्स ११६०) जालना येथून अंबडकडे येत होते, यावेळी उजाड यांच्यासोबत एक ७ वर्षाचा लहान मुलगाही होता. मठपिंपळगाव पाटी येथे उजाड यांनी ट्रकला (एम. पी. ०९ एच.एफ. ४०६०) ओव्हरटेक केले. मात्र, ओव्हरटेक केल्यानंतर अचानक समोर असलेल्या रस्त्यातील खड्ड्यात उजाड यांची दुचाकी आदळली. खड्डा मोठा असल्याने दुचाकीचा तोल गेला व उजाड आपल्या दुचाकीसह पडल्याने रोडवर लांबपर्यंत घसरत गेले. पाठीमागे असलेल्या ट्रकचालकाने आपला ट्रक थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर पडलेल्या उजाड यांच्या अंगावरुन ट्रकचे पुढचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी होऊन बेशुध्द झाले.मठपिंपळगाव पाटीवर मोठया संख्येने नागरिकांची गर्दी होती, अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.केवळ नशीब बलवत्तर असल्याने उजाड यांच्यामागे बसलेला मुलगा उजाड यांच्या विरुध्द बाजूला म्हणजे रोडच्या खाली चिखलात पडल्याने बजावला. अपघातामुळे घाबरलेल्या मुलाला आपण कोण आहोत हे नेमके सांगता येत नसल्याने सदरील मुलगा उजाड यांचा कोण आहे हे कळू शकले नाही.

टॅग्स :Accidentअपघातagitationआंदोलन