शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चोरीस गेलेले बैल एकाच दिवसात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:55 IST

मांजरगाव शिवारातून १६ आॅक्टोबर रोजी चोरीस गेलेले दोन बैल पकडण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील मांजरगाव शिवारातून १६ आॅक्टोबर रोजी चोरीस गेलेले दोन बैल पकडण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तालुक्यातील मांजरगाव शिवारातील सुभाष आहिलाजी आरसूळ यांच्या शेतातील गोठ्यातून ६० हजार रूपये किमतीचे दोन बैल १६ आॅक्टोबर रोजी रात्री चोरीला गेले होते. आरसूळ यांनी नातेवाईकांसमवेत बैलांचा शोध सुरू केला. त्यावेळी रोषणगाव शिवारातील एका पडीक असलेल्या शेतातील एका खोलीत काळ्या रंगाचा त्यांचा बैल त्यांना आढळून आला़ दुसरा पांढऱ्या रंगाचा बैल आढळून आला नाही. त्यामुळे सुभाष आरसूळ यांनी बदनापूर पोलीस ठाणे गाठले. करमाड पोलीस ठाणे हद्दीत सटाणा फाटा येथे एक लोडींग रिक्षामध्ये एक पांढºया रंगाचा बैल पकडला असून, त्याची खात्री करून घ्या असे पोलिसांनी सांगितले. आरसूळ यांनी करमाड पोलीस ठाण्यात जाऊन खात्री केल्यानंतर तो बैल त्यांचाच असल्याचे समजले. आरसूळ यांच्यासह त्यांचे शेजारी रमेश एकनाथ डमरे (रा ढोकसाळ) यांचे बैलही २२ सप्टेंबर २०१९ चोरीला गेले होते़ या प्रकरणात आरसूळ यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात इब्राहिम मिर्झा महेबूब मिर्झा (रा माणिकनगर औरंगाबाद) व अफरोज खाँ रज्जाक खाँ (रा. संजयनगर बायजीपुरा औरंगाबाद) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला.भोकरदनमध्ये घरफोडीचा प्रयत्नभोकरदन : शहरातील देशमुख गल्ली भागातील एका घरात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. शहरातील देशमुख गल्ली भागातील शिवाजीराव देशमुख व कुटुंबातील सदस्य बुधवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते.गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी देशमुख यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडल्यानंतर चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे आतील साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरट्यांनी पळ काढला. गुरूवारी सकाळी हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र चोरीस काहीच न गेल्याने संबंधितांनी तक्रार दिली नाही.

टॅग्स :theftचोरीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारCrime Newsगुन्हेगारी