शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:46 IST

जिल्हाभरात तब्बल १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

विकास व्होरकटे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरोग्य विभागातर्फे मागील तीन महिन्यात लहान बालकांचे वजन मोजण्यात आली असून, यात जिल्हाभरात तब्बल १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. कुपोषित बालकांची ही आकडेवारी वाढण्यामागे महिला, बाल कल्याण विकास विभाग व जिल्हा रूग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगत आहेत. पण, हा कुपोषित बालकांचा आकडा चिंताजनक असल्याचे दिसत आहे.० ते ६ वयोगटातील मुलांना योग्य तो आहार मिळावा. त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी शासनातर्फे विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. असे असले तरीही जिल्ह्यात दिवसेंदिवस कुपोषित बालकांची आकडेवारी वाढत चालली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. आॅक्टोबर महिन्याचा त्रैमासिक अहवाल आरोग्य विभागातर्फे महिला, बाल कल्याण विकास विभागाला दिला आहे. यात त्यांनी आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोंबर या तीन महिन्यात जिल्हाभरात ० ते ६ वयोगटातील १ लाख ३३ हजार २९३ बालकांची वजन मोजली आहेत. यात त्यांना १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. दारिद्र्य कुटुंब स्थलांतरीत होणे यामुळे ही आकडेवारी असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत.जिल्हा रुग्णालय : पोषण पुनर्वसन केंद्रजिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी शासनातर्फे सन २०१६ मध्ये जिल्हा रूग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे कुपोषित बालकांवर १४ दिवस उपचार केले जातात. यामध्ये बालकांना समतोल आहार, फळे, विविध डाळी, पालेभाज्या दिल्या जातात. यामुळे कुपोषित बालके येथे सुदृढ बालके होतात. या पोषण पुनर्वसन केंद्रात मागील वर्षी एप्रिल २०१७-१८ या कालावधीत १५५ बालकांवर उपचार करण्यात आले होते. यंदा एप्ा्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या काळावधित १०९ बालकांनी उपचार घेतले असून सध्या ७ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यFamilyपरिवार