शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'लाडके लेकरू' योजना आणून आम्हालाही पगार सुरू करा; भोऱ्याचं आणखी एक भाषण व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 12:53 IST

मोठ्याल्या पोरांना पगार सुरू केलाय बारक्या पोरांनी सरकारचं घोडं मारलं का? 3 रीच्या भोऱ्याचा सरकारला सवाल. आम्हाला सुद्धा खर्चा पाण्याला पैसे लागतात,  सरसकट मुलांना पगार सुरू करा कार्तिक वजीरची सरकारकडे मागणी.

पवन पवार -

वडीगोद्री (जालना) : मोठाल्या पोरांना सरकार ने पगार सुरू केलाय आम्ही बारक्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं आम्हाला सुद्धा खर्चा पाण्याला पैसे लागतात असं म्हणत कार्तिक वजीर याने सरकारकड सरसकट मुलांना पगार सुरू करण्याची मागणी केली आहे.अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ३ री वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीरने दमदार भाषण केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.सुट्टी असली की बारकाल्या पोरांना घरची काम सांगतात स्वातंत्र नावाचा गलत इस्तेमाल करतात मोठी माणसं सरकारने सगळ्यांना पगार सुरू केला हे बंद करा अशाने आळशी पिढी तयार होईल, मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील  असा सल्ला कार्तिक ऊर्फ भोऱ्या वजीर याने सरकारला दिला आहे. चिमुकल्या कार्तिक वजीर ने स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद शाळेत भाषण केले आहे.आज स्वातंत्र्यदिनी बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का असा प्रश्न विचारला आहे.सुट्टी असली की घरचे काम, रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही.आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले मोठाले माणसं असं म्हणत त्याने लहान मुलांच्या स्वातंत्र्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. इंग्रज कडू होते जुलमी होते पण आपल्या क्रांतिकारी लोकांनी त्यांना पाणी पाजलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण आपल्यासारख्या बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का ? कुणी येत आणि मलाच काम सांगतं सुट्टी असली की घरचे काम रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही.

सरकारने बारीक-सारीक लाडका लेकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा अशी मागणी करत शहाणे व्हा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही.तर स्वातंत्र्यदिनी भोऱ्याने केलेल्या भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनSchoolशाळाStudentविद्यार्थी