लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गासाठी जालना जिल्ह्यात जवळपास जमिनीचे संपादन हे ८५ टक्के झाले आहे. त्यासमुळे नाव्हा ते गेवराई या दरम्यानचे कंत्राट ज्या कंपनीला दिले आहे, त्यसा कंपनीने मार्किंग करण्यासह रस्ता सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या महामार्गाच्या लगत असलेल्या शेतजमिनित शेतळे तसेच शेजारी मॉल्स आणि कोल्डस्टोरेज उभारण्या येणार आहे. दरम्यान शेततळे उभारण्यासाठी शेतकरी उत्सुक नसल्याचे दिसून आले असून, या रस्त्यासाठी लागणारा मुरूम रस्त्या लगत असलेल्या शेतीतून घ्यावा लागणार आहे.समृध्दी महामार्गाच्या जमीन संपादनासह अन्य महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, रस्ते विकास महांडळाचे उपविभागिय अधिकारी हनुमंत आरगुंडे, जालन्याचे उपविभागिय अधिकारी केशव नेटके, नायब तहसीलदार एल.डी. सोनुने, सोनवने, पी.के. ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती. गेल्या काही महिन्यांमध्ये समृध्दीचे काम अंतिम टप्प्यात असून, जालना जिल्ह्यात जवळपास ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादन केली असून, ज्याची टक्केवारी ८८ टक्के एवढी आहे. चारशे कोटी रूपयांपेक्षा अधिकचा मावेजा वाटप करण्यात आला आहे.इंटरचेंजचा मुद्दा सुटेनाजालना येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टमुळे या महामार्गाला मोठे महत्त्व आले आहे. समृध्दी महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असून, यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यासाठी जालन्यात इंटरचेंज पॉइंट साठी जागा सोडण्यात आली आहे. परंतु हा इंटरचेंज खादगाव येथे होणार की, गुंडेवाडी शिवारात होणार, या बद्दल अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.
समृध्दी महामार्गाच्या मार्किंगचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:55 IST