संपामुळे एसटीच्या २३७ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:03 AM2018-06-09T01:03:27+5:302018-06-09T01:03:27+5:30

वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील प्रवाशी वाहतुकीचा खोळंबा झाला

ST due to suspension of 237 rounds | संपामुळे एसटीच्या २३७ फेऱ्या रद्द

संपामुळे एसटीच्या २३७ फेऱ्या रद्द

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील प्रवाशी वाहतुकीचा खोळंबा झाला. बहुतांश वाहक, चालक व यांत्रिक कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे ३६३ पैकी २३७ फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.
जिल्ह्यात जालना, जाफराबाद, परतूर, अंबड आगारातून बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होते. एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी वेतनवाढीच्या मुद्द्यावर रात्री बारावाजेपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम जिल्ह्यातही दिसून आला. जालना आगारातील पुणे, लोणार आणि चिकनगाव मार्गावरील बस फे-या रद्द करण्यात आल्या.
जालना बस आगारातील ८७ पैकी २८ फे-या रद्द करण्यात आल्या. अंबड आगारातील १०३ पैकी ७०, परतूर आगाराच्या ५१ पैकी ४७, जाफराबाद आगाराच्या १२२ पैकी ९२ बस फे-या रद्द वाहक, चालक न आल्यामुळे रद्द कराव्या लागल्या.
जिल्ह्यातील एकूण ६५ टक्के बस फे-या संपामुळे रद्द झाल्याची माहिती एसटीच्या विभागीय कार्यालयातील साहाय्यक वाहतूक अधीक्षक लक्ष्मण म्हस्के यांनी दिली. तर कुठलीही पूर्वसूचना न देता कामावर न येणा-या जालना आगारातील ५२
कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित केल्याचे आगार प्रमुख चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, विविध रस्त्यांवरून धावणा-या बसफे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. काही ठिकाणी ऐनवेळी बदली कर्मचा-यांना पाठवावे लागले. एकंदरीतच २३७ बस फे-या रद्द झाल्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले.

Web Title: ST due to suspension of 237 rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.