शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मुलगी सुखरूप आल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 01:03 IST

घर सोडून निघून गेलेल्या एका दहा वर्षीय मुलीला राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा यांच्या सतर्कतेमुळे आणि दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या मदतीमुळे आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आई सारखी रागावते,नेहमी मारते म्हणून आईविषयी मनात राग धरून घर सोडून निघून गेलेल्या एका दहा वर्षीय मुलीला राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा यांच्या सतर्कतेमुळे आणि दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या मदतीमुळे तिची समजूत काढून सुखरूपपणे आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलीला सुखरूप घरी परतल्याचे पाहून पालकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी दामिनी पथकाचे तसेच राखीव पोलीस दलातील गावंडे दाम्पत्याचे आभार मानले. दरम्यान, दामिनी पथकाच्या वतीने पल्लवी जाधव यांनी गावंडे दाम्पत्याचा सत्कार केला.जालना शहरातील नूतन वसाहत भागातील रहिवासी अनिता सुभाष पांडव हे दांपत्य भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे ते मंगळवारी ( दि.२६) सकाळी ते दोघेही भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलेले होते. तेव्हा त्यांची मुलगी साक्षी (वय १० वर्ष) ही पिशवीमध्ये कपडे घेऊन घरातून निघून गेली. दरम्यान, ती पायी चालत चालत महसूल कॉलनीत फिरत असताना या भागात राहणारे राखीव पोलीस दलातील शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा गावंडे यांनी साक्षीची विचारपूस केली. तेव्हा साक्षीने सांगितले की, माझी आई मला नेहमी रागावते आणि मारते म्हणून मी घर सोडून चालले आहे. मला घरी जायचे नाही. तुमच्याकडेच मला राहू द्या, असे तिने सांगितल्यामुळे पूजा गावंडे यांनी ही बाब लगेच त्यांचे पती दीपक गावंडे यांना सांगितली. दीपक गावंडे यांनी तात्काळ दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना ही माहिती दिली. पल्लवी जाधव यांनी वेळ न दवडता ताफ्यासह महसूल कॉलनी गाठून गावंडे दाम्पत्याची भेट घेत साक्षीला समजावून सांगून तिची आस्थेवाईकपणे समजूत काढली. तेव्हा साक्षी परत आई वडिलांकडे जाण्यास तयार झाली.त्यानंतर पल्लवी जाधव यांनी पथकासह साक्षी पांडव हिचे घर गाठले. साक्षीची आई अनिता पांडव आणि वडील सुभाष पांडव यांना समजावून सांगितले. साक्षी लहान आहे. तिला मारहाण न करता प्रेमाने समजावून सांगावे, असा सल्ला दिला. त्यानंतर पांडव दांपत्याने साक्षीला घरी आणल्याबद्दल दामिनी पथक आणि पोलीस कर्मचारी गावंडे दाम्पत्याचे आभार व्यक्त केले.यावेळी जाधव यांच्या सोबत दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी एस.एम.खांडेभराड, ए. डी.साबळे, आर.एल.राठोड , यू. पी. साबळे, वाहनचालक व्ही. एस. तायडे यांचा सहभाग होता.दरम्यान , राखीव पोलिस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे व त्यांच्या पत्नी पूजा यांचा सत्कार केला. बाल दिनी देखील दामिनी पथकाने एका हरवलेल्या मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते. दामिनी पथकाच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसFamilyपरिवारSocialसामाजिक