शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कृत्रिम हात-पायांमुळे फुलले दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:44 IST

तब्बल १६० अबाल-वृध्द दिव्यांगांना कृत्रिम हात-पायांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमत समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समाचार आणि साधू वासवानी ग्रुपच्या वतीने रविवारी जालना शहरात आयोजित मोफत कृत्रिम हात-पाय वाटप शिबिरात अनेक दिव्यांग आशेने आले होते. शिबिरात आलेल्या तब्बल १६० अबाल-वृध्द दिव्यांगांना कृत्रिम हात-पायांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे जीवन जगणे सुसहाय्य होणार असल्याने शिबिरातून परतणाºया प्रत्येक दिव्यांगाच्या चेहºयावर हस्य फुलल्याचे दिसून आले.कार्यक्रमास नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, जिल्हा प्रतिनिधी रमेश बागडी, व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, संजय देशमुख, लायन्स क्लब जालनाचे वरिष्ठ सदस्य रामनारायण अग्रवाल, मधुकर बैंक्वेटचे संचालक हर्ष जयपुरिया, साधू वासवानी ग्रुपचे मिलिंद जाधव यांच्यासह उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख डॉ. कैलास सचदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी लोकमत समाचार च्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, मोफत हात-पाय वाटप वाटप उपक्रमामुळे शहरासह जिल्हाभरातील दिव्यांगांना मोठा आधार मिळाला आहे. असे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविणे काळाची गरज आहे. शिवाय नगर पालिकाही दिव्यांगांसाठी विशेष काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव म्हणाले, लोकमत समाचारच्या वतीने प्रथमत: २०१५ मध्ये कृत्रिम हातपाय बसविण्याचे शिबीर राबविण्यात आले. त्यावेळी परराज्यातील गरजूंनीही नाव नोंदणी केली होती. त्यावेळी या शिबिराची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजवर राबविलेल्या शिबिरातून ४ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. यावेळी मधुर कैक्वेट हॉलचे संचालक हर्ष जयपुरिया, डॉ. कैलाश सचदेव, सलील जैन यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जालना जिल्ह्यासह बीड, परभणी, हिंगोली, लातूर आदी ठिकाणाहून आलेल्या २ वर्षे वयाच्या मुलापासून ६० वर्षे वयाच्या वृध्दांना अशा एकूण १६० जणांना मोफत कृत्रिम हात-पायांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.गरजूंना कृत्रिम हात-पाय बसविण्यासाठी साधू वासवानी ग्रुपचे मिलिंद जाधव, सुशील ढगे, अनुराग सिंगमनी तसेच पुणे येथीलच महावीर इंटरप्राईजेसचे सलील जैन, संजय जाधव, राहुल सरोज, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र राठोड, दत्तात्रय राक्षे यांचे या शिबिरास विशेष सहकार्य मिळाले.

टॅग्स :Divyangदिव्यांगSocialसामाजिकLokmat Eventलोकमत इव्हेंट