शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील ६१७ जणांनी घेतली विषाची परीक्षा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:56 IST

विजय मुंडे । लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कौटुंबिक, सामाजिक , आर्थिक अशा एक ना अनेक कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांचे ...

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक अशा एक ना अनेक कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असल्याचे चित्र आहे. चालू वर्षात विषारी द्रव प्राशन केलेल्या तब्बल ६१७ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यात ३४९ पुरूष तर २६८ महिलांचा समावेश आहे. विषाची परीक्षा घेतलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला असून, इतरांना जिल्हा जिल्हा रूग्णालयात वेळेत औषधोपचार मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले आहेत.दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. हे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता विविध कारणांनी सर्वसामान्य नागरिक, महिलांच्या होणाºया आत्महत्या आणि त्याचे वाढणारे प्रमाण चिंतनीय आहे. जालना जिल्ह्यातही हे प्रमाण वाढताना दिसत आहे.यात विषारी द्रव प्राषण करून आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चालू वर्षात आजवर विषारी द्रव प्राषण केलेल्या ३४९ पुरूषांसह २६८ महिलांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यात जानेवारीत ४३ पुरूष, ४४ महिला, फेबु्रवारीत १९ पुरूष, १६ महिला, मार्चमध्ये २७ पुरूष, ३६ महिला, एप्रिलमध्ये ३१ पुरूष, २४ महिला, मे महिन्यात ३५ पुरूष ४ महिला, जूनमध्ये ३० पुरूष, २५ महिला, जुलैमध्ये ३९ पुरूष, ३५ महिला, आॅगस्टमध्ये ६१ पुरूष, ४९ महिला तर सप्टेंबर महिन्यात ६४ पुरूष आणि ३५ महिलांनी विष प्राशन केले होते. संबंधितांना प्रथमोपचारानंतर जालना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा रूग्णालयातील महिला, पुरूष वॉर्डमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांनी वेळेवर केलेल्या औषधोपचारामुळे ६१७ पैकी ६१५ जणांचे प्राण बचावले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. विविध कारणांनी आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांची वाढती संख्या रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय पातळीवरून गावा-गावात विशेष उपक्रम राबवून सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.तिस-यावेळी झाला मृत्यूविष प्राशन केल्यानंतर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील एका महिलेने तीन वेळेस विष प्राशन केले होते. दोन वेळेस संबंधित महिलेचे प्राण बचावले. मात्र, तिस-यावेळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका वृध्द महिलेनेही विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी