शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शु छे?, तमे केम छो?, तमारा स्कूल नू नाम शु छे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:35 IST

सध्या जि. प. च्या शाळेतून भाषा संगम कार्यक्रमाने चांगलीच उभारी घेतली असून विद्यार्थी मोठ्या आवडीने परप्रांतीय भाषेतील पाच वाक्ये आपसात बोलत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : सध्या जि. प. च्या शाळेतून भाषा संगम कार्यक्रमाने चांगलीच उभारी घेतली असून विद्यार्थी मोठ्या आवडीने परप्रांतीय भाषेतील पाच वाक्ये आपसात बोलत आहेत.इतकेच नाही तर या माध्यमातून काही शाळेतील विद्यार्थी थेट दुसऱ्या राज्यात संपर्क साधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणेही सुरू केले आहे. बुधवारी या कार्यक्रमांंतर्गत गुजराथी भाषेचा सराव विद्यार्थ्यांना दिला गेला. दरम्यान या दिवशी जाफराबाद गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती तथा या उपक्रमाचे तालुका समन्वयक दादा जगदाळे यांनी तालुक्यातील डावरगाव देवी शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा गुजराथी भाषेचा सराव अगोदरच शिक्षकांनी घेतला होता. यावेळी जगदाळे यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एफ. डी. बॉईज हायस्कूल चा मोबाईल नंबर आॅन लाईन प्राप्त करून तेथील मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची विनंती केली. त्या मुख्याध्यापकांनीही लगेच होकार देऊन विद्यार्थी- विद्यार्थी संवाद.घडवून आणला.यावेळी डावरगाव देवी येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी गायत्री नवले व सूरज अढावे यांनी नमस्कार, तमारू नाम शु छे?, तमे केम छो?, तमारा स्कूल नू नाम शु छे ? आदी छोटी वाक्ये बोलून तेथील १० वीतील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. यावेळी अचानक झालेल्या या भावनिक संवादाने दोन्ही कडील विद्यार्थी भारावून गेले.यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एस.डी.नवले, टेंभुर्णीचे केंद्रप्रमुख गणेश पवार, केंद्रीय मुख्याध्यापक आर.डी.लहाने, डावरगाव चे मुख्याध्यापक महेश अहीरे, शिक्षक जमीर शेख, गोविंद जाधव, तुळशीराम जाधव सुखदेव वर्गणे, रत्ना देशमुख, पुष्पा साखरे, संतोष अढावे, रवी पैठणे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणgovernment schemeसरकारी योजना