लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : येथे बसस्थानकापासून जवळच असलेल्या साई इलेक्ट्रीकल या दुकानाला शॉर्टसर्किट मुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.आष्टी येथील मुख्य रस्त्यावर अनंता दादाराव बोरकर यांचे साई इलेक्ट्रीकल हे दुकान आहे. रविवारी रात्री नऊ वाजता बोरकर हे दुकान बंद करुन घरी गेले. रात्री एक वाजता दुकानाला आग लागल्याचे फोनवर कळाले. ते येईपर्यंत दुकान पूर्ण जळून खाक झाली होती. दुकानात कुलर , फ्रीज,टी.व्ही., डिश ,फॅन या बरोबरच दुरुस्ती साठी आलेल्या अनेक वस्तू होत्या. शेजारी राहणाऱ्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुकानातील इलेक्ट्रिकल सामान पूर्णपणे जळून खाक झाले.आष्टी पोलीस ठाण्याचे प्रवीण देशमुख यांनी दुकानाचा पंचनामा केला. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:44 IST