शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावात पाण्यासाठी ‘शोले स्टाईल वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:55 IST

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर गावात रविवारी महिलांनी पाणी मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेत पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल वीरुगिरी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर गावात रविवारी महिलांनी पाणी मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेत पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल वीरुगिरी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.परतूर शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून शहरासाठी शुध्द पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, शहराच्या अनेक भागात अद्याप शुद्ध पाणी पोहचलेले नाही. तर काही भागात पाच ते दहा मिनिटेच पाणीपुरवठा होतो. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी गैरसोय होते.शहरातील राजपूत गल्लीतील महिलांनी नगरपालिकेत अनेकदा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिली आहेत. परंतु वारंवार तक्रार करूनही पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने काही महिलांनी रविवारी दुपारी टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पाणीप्रश्न सुटणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला. आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक कृष्णा अरगडे यांनी मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांना कळविले. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी पाण्याच्या टाकीजवळ पोहोचले. या वेळी आंदोलनकर्त्या महिला व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांमध्ये काही वेळ जुंपली. मुख्याधिकारी ईरलोड यांनी मध्यस्थी करत या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या लवकरच सोडवली जाईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले. त्यानंतर महिला पाण्याच्या टाकीवरून खाली उतरल्या. आंदोलनात सरस्वती काळे, सविता रासे, रामप्यारी ताटू, कुशीवर्ता फटींग, नंदाबाई रासे, कासाबाई चव्हाण, मालती बाई महेर, राधाबाई ताटू, नंदाबाई दिरंगे, लक्ष्मी काळे, पूजा काळे, रूख्मिणी रासे, लक्ष्मीबाई भुजा, नीता महेर, कावेरी रासे, लताबाई रासे आदी महिलांनी सहभाग घेतला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईagitationआंदोलन