शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कपाटाचे कुलूप तोडून रेकॉर्ड केले लंपास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:54 IST

ग्रामसेवकास शिवीगाळ करीत कपाटाचे कुलूप तोडून रेकॉर्ड लंपास केल्याप्रकरणी तीन ग्रामपंचायत सदस्यांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : ग्रामसेवकास शिवीगाळ करीत कपाटाचे कुलूप तोडून रेकॉर्ड लंपास केल्याप्रकरणी तीन ग्रामपंचायत सदस्यांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अंबड तालुक्यातील रूई ग्रामपंचायतीत शनिवारी सकाळी घडली.रुई ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक नंदकुमार मंदोडे हे शनिवारी सकाळी ग्रामपंचायतीत काम करीत होते. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब भगवान राजगुरू, ईश्वर भगवान धाईत, कृष्णा लिंबाजी खंडरे हे तेथे आले. ग्रामसेवक मंदोडे यांना ‘ग्रामपंचायत सभा घ्या’ अशी मागणी त्यांनी केली. मंदोडे यांनी एकच ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे कोरम पूर्ण होऊ शकत नाही. आजची सभा सविस्तर नोटीस काढून नंतर घेऊ, असे सांगितले. त्यावेळी संबंधितांनी ग्रामपंचायतचे रेकॉर्डची मागणी केली. ग्रामसेवकांनी रेकॉर्ड अलमारीत असल्याचे सांगत चावी नाही, सोमवारी रेकॉर्ड दाखवितो, असे सांगितले. त्यावेळी तात्यासाहेब राजगुरू, ईश्वर धाईत, यांनी अलमारी तोडून त्यामधील रेकॉर्ड काढून घेतले. मंदोडे यांनी विरोध केला असता संबंधितांनी शिवीगाळ केली. तसेच लोटलाटी करीत जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार ग्रामसेवक मंदोडे यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून तात्यासाहेब भगवान राजगुरू, ईश्वर भगवानराव धाईत व कृष्णा लिंबाजी खंडरे (सर्व रा. रुई) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि उस्मान सय्यद हे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायतtheftचोरी