शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहागड येथे महिलेवर पाळत ठेवून पर्स पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 00:39 IST

कापड दुकानात गेलेल्या महिलेची पर्स चोरून चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने लंपास केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : कापड दुकानात गेलेल्या महिलेची पर्स चोरून चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी दुपारी शहागड (ता.अंबड) येथील बसस्थानकासमोरील दुकानात घडली.गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील ममता बद्रीनाथ शिंदे या रविवारी सकाळी त्यांच्या पतीसमवेत खासगी वाहनातून जालना येथे लग्न कार्यासाठी जात होत्या. शहागड (ता.अंबड) येथे उतरून बसस्थानक समोरील एका कापड दुकानातून कापड खरेदी करण्यासाठी त्या गेल्या. दुकानात जाऊन कापडांची पाहणी त्या करीत होत्या. त्यावेळी एक अनोळखी महिला व मुलगी दुकानात आली. शिंदे यांच्या जवळ उभे राहून कापडांची विचारपूस केली. मात्र, खरेदी न करता त्या दोघी निघून गेल्या. त्यानंतर काही वेळातच आपली पर्स चोरीस गेल्याचे ममता शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या महिलेसह मुलीचा शोध घेताला. मात्र, तोपर्यंत त्या दोघी फरार झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी कापड दुकान व व्यापारी संकुलनात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. मात्र ती महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली नाही. चोरीस गेलेल्या पर्समध्ये एक तोळ्याचे नेकलेस, साडेचार तोळ्याचे गंठण, रोख एक हजार ३२० रुपये असल्याची तक्रार त्या महिलेने शहागड पोलिस चौकीत दिली आहे. दरम्यान, वाढलेल्या चो-या पाहता चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.ममता शिंदे ही महिला ज्या वाहनात बसून शहागड येथे आली. त्याच वाहनात गेवराई येथे बसलेली ती महिला व मुलगी शहागड येथे आली होती.ममता शिंदे खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर त्या दोघींनी तेथे जाऊन पर्सची चोरी केली. शिंदे यांच्यासोबत गेवराई येथून प्रवास करताना पाळत ठेवून ही चोरी केल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :theftचोरीWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी