शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 18:00 IST

शाळा सुटल्यानंतर ही घटना  घडल्याने मोठा अनर्थ टळला. 

पारध (जालना ) : भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्यावरील पत्रे कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर ही घटना  घडल्याने मोठा अनर्थ टळला. 

पारध खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना १९६० मध्ये झाली होती. येथे इयत्ता पहिली ते आठपर्यंतचे १३४ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत आठ वर्गखोल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर दोन वर्गखोल्यावरील पत्रे अचानक कोसळली. सुदैवाने शाळेत कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. 

वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीने पंचायत समिती भोकरदन व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या घटनेमुळे शिक्षण विभागाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.

दुरुस्तीची मागणीदरम्यान, या खोल्याजवळ कायम विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे या वर्ग खोल्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आम्ही अनेकवेळा प्रशासनाकडे वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी केली. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून, आता तरी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी माजी सरपंच आर. आर. पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकJalanaजालना