शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शहरात गावठी पिस्तूल आढळण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:49 AM

गावठी पिस्तूल वापरणाऱ्या दोघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास जालना शहरातील घृष्णेश्वर चौकात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावठी पिस्तूल वापरणाऱ्या दोघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास जालना शहरातील घृष्णेश्वर चौकात करण्यात आली. पोलिसांनी पिस्तूल, कारसह एकूण १ लाख ८० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या सुनील वनारसे याने ही पिस्तूल पुरवठा केल्याचे समोर आले आहे.गावठी पिस्तूल बाळगणारा युवक एका कारमधून जात असल्याची माहिती सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख यांना मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना माहिती देऊन त्यांच्यासह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील घृष्णेश्वर चौकात सापळा रचला. त्यावेळी मंठा चौफुलीकडून भरधाव वेगात आलेल्या कारला (क्र. एम. एच. २२- ए. एम. १६१३) थांबविण्यात आले. आतील विकास जयराम शिंदे (रा. पांगारकर नगर, जालना), किशोर दामोदर घुगे (रा. स्वामी समर्थ नगर, जालना) या दोघांची चौकशी केली. त्यावेळी विकास शिंदे याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळून आले. त्याच्याकडील पिस्तूल, कारसह मोबाईल, काठी व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिस्तूल खरेदीबाबत विचारणा केल्यानंतर ती पिस्तूल सुनील वनारसे (रा. नूतन वसाहत, जालना) याच्याकडून ३० हजार रूपयांमध्ये खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोनि संजय देशमुख यांच्या तक्रारीवरून वरील तिघांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रूपेकर, पोलीस कर्मचारी संदीप बोन्द्रे, समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे, साई पवार, सोपान क्षीरसागर, फुलचंद गव्हाणे, स्वप्नील साठेवाड, जतीन ओहोळ यांच्या पथकाने केली.गावठी पिस्तूल आयातीचा पत्ता मिळेनापोलिसांनी गत काही महिन्यात जवळपास १२ गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. यातील अनेक पिस्तूल सुनील वनारसे याने विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वनारसे विरूध्द कारवाई करण्यात आली आहे. मात्र, विविध गुन्ह्यातील तपासामध्ये वनारसे याने विक्री केलेले किंवा इतर आरोपींनी वापरलेल्या गावठी पिस्तुले आणली कोठून, याचा पत्ता लागलेला नाही. काही राज्यात पथकेही गेली. मात्र, मिळालेली माहिती चुकीची असल्याचे तेथे गेल्यानंतर पथकाच्या लक्षात आले.दोघांनी पळून जाण्याचा केला होता प्रयत्नपोलिसांनी घृष्णेश्वर चौकात नाकाबंदी केली होती. पोलिसांनी केलेली नाकाबंदी पाहून कार चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधिकारी, कर्मचा-यांची काटेकोर नाकाबंदी असल्याने ते दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक