लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : वडीगोद्री- जालना राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. बुधवारी रात्री सळई घेऊन निघालेला ट्रक धाकलगाव जवळ उलटला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.जालना येथून लोखंडी सळई घेऊन एक ट्रक (क्र.एम.एच.१९- झेड. ५०३९) बुधवारी सायंकाळी बीडकडे जात होता. हा ट्रक वडीगोद्री- जालना महामार्गावरील धाकलगाव पाटीजवळ आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. ट्रकचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी ३ जानेवारी रोजी कांदा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला होता. तर ५ जानेवारी रोजी लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक याच मार्गावर उलटला होता. तर ७ जानेवारी रोजी ठिबकचे बंडल घेऊन जाणारे वाहन उलटले होते. खड्ड्यांमुळे अपघाताचे सत्र सुरूच असून, संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या मार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
वडीगोद्री- जालना मार्गावर अपघातांची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:34 IST